गणेशोत्सवानंतर अनेक चाकरमानी ऑक्टोबर/नोव्हेंबर महिन्यात दिवाळीसाठी जाताना दिसतात. त्यात या महिन्यात छठपूजा हा पारंपरिक सण देखील येत असल्यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते. ही वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विविध मार्गावर 418 विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि कोल्हापूरसह विविध स्थानकांहून उत्तर भारत, दक्षिण भारताच्या गाड्यांचा समावेश आहे.
आरक्षण सुरू
काही विशेष गाड्यांचे आरक्षण 27 सप्टेंबरपासून, तर उर्वरित गाड्यांचे आरक्षण 28 सप्टेंबरपासून संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर सुरू होईल. प्रवाशांना IRCTCची वेबसाईट तसेच RailOne App द्वारे तिकीट बुक करता येणार आहे. तर जनरल डब्यांसाठी UTS ॲपद्वारे सामान्य दराने तिकिटे उपलब्ध असणार आहेत.
कोणत्या विशेष गाड्या सुटणार?
Konkan Railway: कोकणवासीयांसाठी रेल्वेची दिवाळी भेट! विशेष गाड्या धावणार; कुठे-कुठे थांबणार? पाहा यादी
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.