Saturday, July 20, 2024 11:33:26 AM

रोहित सराफने मुंबईत 'सनी संस्कार की तुलसी कुमारी'च्या चित्रीकरणाला केली सुरुवात

रोहित सराफ हा कायम वैविध्यपूर्ण भूमिका मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो आणि त्याच्या नुकत्याच आलेल्या 'इश्क विश्क रिबाऊंड' या चित्रपटा ने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली

रोहित सराफने मुंबईत सनी संस्कार की तुलसी कुमारीच्या चित्रीकरणाला केली सुरुवात 

 

रोहित सराफ हा कायम वैविध्यपूर्ण भूमिका मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो आणि त्याच्या नुकत्याच आलेल्या 'इश्क विश्क रिबाऊंड' या चित्रपटा ने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली. अलीकडेच मुंबईत त्याने त्याच्या 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' च्या शूटला सुरुवात केली. अभिनेत्याने समाज माध्यमावर क्लिपबोर्डचा एक फोटो शेअर केला आणि त्याचे सह कलाकार सान्या मल्होत्रा, वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांना टॅग केले.

तत्पूर्वी धर्मा प्रॉडक्शनच्या चित्रपटाच्या मुहूर्त पूजेची झलक त्याने समाज माध्यमावरशेअर केली होती.  उत्साह व्यक्त करताना त्यांनी लिहिले होते " याची वाट पाहू शकत नाही” रोहित सराफच्या भूमिकेचे तपशील अद्याप गुलस्त्यातच असून शशांक खेतान दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता काय भूमिका साकारणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. 

'सनी संस्कार की तुलसी कुमारी' च्या पलीकडे रोहित सराफ 'मिसमॅच 3' मध्ये ऋषी सिंग शेखावतच्या त्याच्या लाडक्या भूमिकेची पुनरावृत्ती करताना दिसणार आहे. याशिवाय तो मणिरत्नमच्या ‘ठग लाइफ’साठीही तयारी करत आहे, ज्यामध्ये तो दिग्गज कमल हासनसोबत पहिल्यांदाच स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसेल. 
 


सम्बन्धित सामग्री