पावसाळा सुरू झाला आणि सोमवारच्या दिवशी चारकमण्यांची पावसामुळे तारांबळ उडाली होती अश्यातच अभिनेत्री सई ताम्हणकर हिने प्रेक्षकांना घरी बसण्याच आवाहन केलं. सोमवारी पडलेल्या पावसाने मुंबईला झोपडून काढलं आणि म्हणून सई ने तिच्या प्रेक्षकांना हा खास सल्ला दिला.
सई ने समाज माध्यमावर स्टोरी टाकून " आज मुकाट्यानं घरी बसा " अस सांगितल आहे आणि मुंबईकरांना घरात बसण्यासाठी आवाहन केलं. टेक केअर मुंबई अस म्हणत तिने सगळ्यांना काळजी देखील घ्यायला सांगितलं.
कायम आपल्या नाविन्यपूर्ण कलेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या सईने तिच्या प्रेक्षकांना ही खास विनंती केली.