मुंबई: अभिनेता सैफ अली खानला नुकताच डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर आता सैफच्या अडचणीत वाढ होणार की काय असा प्रश्न सर्वांचं पडलाय. सैफ अली खानची15 हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त होणार असल्याची शक्यता आहे. 6 दिवसांपूर्वीच सैफवर चाकू हल्ला झाला, लीलावती रुग्णालयात सैफवर उपचार सुरु होते. आज त्याला डिस्चार्ज मिळाला आणि आताच त्याच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
नवाब पतौडी यांचे वारसदार सैफ अली खान यांची 15 हजार कोटी रुपयांची संपत्ती मध्यप्रदेश सरकार ताब्यात घेण्याची शक्यता आहे.भोपाळ संस्थानाच्या ऐतिहासिक भूमीवरील शत्रू संपत्ती प्रकरणात गेल्या 10 वर्षांपासून सुरू असलेली स्थगिती आता संपुष्टात आली आहे. मध्य प्रदेश हायकोर्टने अभिनेता आणि त्याच्या कुटुंबीयांना मालमत्तेवर दावा सादर करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली होती. पण आता ही मुदत संपली आहे. त्यामुळे सैफ अली खानची भोपाळमधील तब्बल15 हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त होऊ शकते.
मध्य प्रदेशच्या हायकोर्टामध्ये सैफ अली खानच्या मालमत्तेविरोधात शत्रू संपत्तीचा खटला सुरू आहे. या प्रकरणी हायकोर्टाने सैफ अली खान, त्याची आई शर्मिला टागोर, बहीण सोहा आणि सबा अली खान आणि पतौडीची बहीण सबिहा सुलतान यांना शत्रूच्या मालमत्तेच्या प्रकरणात अपीलीय अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले होते. यासाठी त्यांना 30 दिवसांचा कालावधी दिला होता. पण 30 दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही कुटुंबातील एकाही सदस्याने मालमत्तेवर आपला हक्क मांडला नाही. अशा स्थितीत राज्य सरकार त्यांच्या मालकीची जमीन जप्त करू शकते.
दरम्यान मध्य प्रदेश हायकोर्टने अभिनेता सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबीयांना मालमत्तेवर दावा सादर करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली होती. पण आता ही मुदत संपली आहे. त्यामुळे संपत्ती जप्त होण्याची शक्यता आहे.