Thursday, July 18, 2024 10:48:12 PM

‘दंगल’ फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचं निधन

‘दंगल’ फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचं निधन

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याचा सुपरहिट चित्रपट 'दंगल'मध्ये बबिता फोगट हिच्या बालपणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुहानी भटनागरचे निधन झाले. सुहानी भटनागर अवघ्या १९ वर्षांची होती.

काही दिवसांपूर्वी सुहानीचा अपघात झाला होता. या अपघातात तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारांदरम्यान तिला देण्यात आलेल्या औषधांमुळे तिच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला होता. या प्रतिक्रियेमुळे सुहानीच्या शरीरात पाणी साठू लागले होते. यामुळे तिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात बराच काळ दाखल करण्यात आले होते.

सुहानी भटनागर हिच्यावर उपचार सुरू असतानाच तिची प्राणज्योत मालवली आहे. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी सुहानी भटनागर हिचे निधन झाल्याने आता मनोरंजन विश्वातून देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉक्टरांनी सुहानीला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तरीही तिचा जीव वाचू शकला नाही. १७ फेब्रुवारी रोजी सुहानी भटनागर हिने अखेरचा श्वास घेतला. सुहानी भटनागरच्या निधनामुळे तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या आई-वडिलांची अवस्था देखील वाईट झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सुहानी तिच्या कुटुंबासोबत फरीदाबादमध्ये राहत होती. शनिवारी सकाळी उपचारांदरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला. अजरोंदा येथील स्मशानभूमीत तिच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.


सम्बन्धित सामग्री