Saturday, July 20, 2024 11:35:10 AM

कपाळी कुंकू , गळ्यात डोरलं , बोरमाळ, कातिल नजर ; पुष्पा २ मधील 'श्रीवल्ली' चा हटके लुक

कपाळी कुंकू  गळ्यात डोरलं  बोरमाळ कातिल नजर  पुष्पा २ मधील श्रीवल्ली चा हटके लुक

प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 'पुष्पा -2' निर्मात्यांनी श्रीवल्लीचा पहिला हटके बेधडक लूक समोर आला आहे.

Rashmika Mandanna's intriguing poster as 'Srivalli' from Pushpa 2: The Rule’ is out on her 28th birthday

मुंबई, ५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : बॉक्स ऑफिसवर भरगोस कमाई नंतर पुष्पाचा दुसरा भाग 'पुष्पा-2' (Pushpa 2 The Rule) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये प्रसिद्धी मिळालेला साऊथचा अभिनेता अल्लू अर्जुनने साकारलेल्या पुष्पा या व्यक्तिरेखेसोबत अभिनेत्री रश्मिकाने साकारलेली श्रीवल्ली ही व्यक्तीरेखा प्रेक्षकांना खूप आवडली असून प्रेक्षकांनी भरगोस प्रेम दिले . चित्रपटातील 'श्रीवल्ली' या गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला असून संपूर्ण जगाने ह्या गाण्यावर ताल धरला होता. दरम्यान रश्मिका मंदानाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 'पुष्पा -2' निर्मात्यांनी श्रीवल्लीचा फर्स्ट लूक समोर आला असून चांगलाच चर्चेत असल्याचे दिसून येते.

पोस्टरमध्ये श्रीवल्लीने साडी नेसील असून दागिने परिधान केली आहे. कपाळी असलेले कुंकू आणि गळ्यात असणाऱ्या डोरल्याने आणि रश्मिकाच्या आक्रमक नजरेने प्रेक्षकांचे लक्ष चांगलेच आकर्षक करून घेतले आहे.लोकांचे हृदय चोरणारी श्रीवल्ली उर्फ रश्मिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा अशी कॅप्शन देण्यात आली आहे.


सम्बन्धित सामग्री