Saturday, October 12, 2024 10:17:15 PM

म्हणून संस्कृती ने घेतला सोशल ब्रेक !

म्हणून संस्कृती ने घेतला सोशल ब्रेक

मुंबई, १५ एप्रिल २०२४ प्रतिनिधी : फॅशन, लाइफस्टाइल आणि जिच्या अभिनयाच्या वेगळेपणासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे ! वैविध्यूर्ण भूमिका तिने कायम साकारल्या आणि प्रेक्षकांना मोहित केलं. अभिनयाच्या पलिकडे जाऊन ही अभिनेत्री एक कलाकार सुद्धा आहे हे तिच्या सोशल मीडिया वरून कळून येत मग ते नृत्य असो किंवा चित्रकला संस्कृती कायम स्वतःचे छंद जोपासताना दिसते.

काही दिवसांपासून संस्कृती ने सोशल मीडिया वरून ब्रेक घेतला होता आणि आता नुकतीच ती सोशल मीडिया वर पुन्हा आली आहे. आता तिने हा सोशल मीडिया ब्रेक का ? घेतला होता असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. संस्कृती ने सोशल मीडिया वर कम बॅक केलं ते थेट लेह लडाक च्या स्टोरी मधून आता ती तिकडे शूट साठी गेली होती की कामा साठी हे अजून स्पष्ट झालं नाही.

हल्ली अनेक कलाकार स्वतःच्या धावपळीच्या जगातून ब्रेक घेण्यासाठी सोशल डिटॉक्स वर जातात पण संस्कृती ही कायम सोशल मीडिया वर अॅक्टिव असलेली अभिनेत्री अशी अचानक का गायब झाली असावी हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. संस्कृती स्वतः हा या बद्दल काही सांगणार का ? नवीन प्रोजेक्ट्स बद्दल काही बोलणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

आगामी काळात संस्कृती बालगुडे बॉलिवुड मध्ये दिसणार आहे सोबतीने ती अनेक प्रोजेक्ट्स मधून सुद्धा दिसणार आहे.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo