मुंबई, ९ मे २०२४, प्रतिनिधी : २०२४ हे वर्ष फक्त नवनवीन प्रोजेक्ट्स तर आहेच पण सोबतीला मनोरंजक चित्रपटात नवीन ऑन-स्क्रीन जोड्यादेखील दिसणार आहेत. प्रेक्षक मोठ्या पडद्यावर नवीन जोड्या आणि त्यांची धमाकेदार केमिस्ट्री पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.
रोहित सराफ - पश्मिना रोशन
रोहित सराफ आणि पश्मिना रोशन ही जोडी आगामी रोम-कॉम ‘इश्क विश्क रिबाउंड’ मध्ये पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. रोहित सराफने त्याच्या लोकप्रिय मालिका 'मिसमॅच्ड' द्वारे आधीच 'नॅशनल क्रश' म्हणून स्वत:ची ओळख संपादन केली आहे आणि आता चाहते पश्मिना रोशनसोबतची केमिस्ट्री बघण्यासाठी उत्सुक आहेत. हा चित्रपट २८ जून रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
तृप्ती दिमरी - कार्तिक आर्यन
तृप्ती डिमरी आणि कार्तिक आर्यन ‘भूल भुलैया ३’ मध्ये पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. लोकप्रिय हॉरर-कॉमेडी चित्रपटात या दोघांना पाहण्यासाठी नेटिझन्स उत्सुक आहेत.
आदित्य रॉय कपूर - सारा अली खान
अनुराग बसूच्या ‘मेट्रो…इन डिनो’ मध्ये आदित्य रॉय कपूर पहिल्यांदाच सारा अली खानसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार असल्याने प्रेक्षकांना खूप आनंद झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काम करत असलेला हा चित्रपट या वर्षी २९ नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
शर्वरी वाघ - जॉन अब्राहम
शर्वरी वाघ आणि जॉन अब्राहम आगामी ॲक्शनर ‘वेदा’ मध्ये एकत्र दिसणार आहेत. काही वेळापूर्वी प्रदर्शित झालेल्या वेदाच्या टीझरने प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढवली आहे. हा चित्रपट १२ जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.