Wednesday, March 11, 2026 06:51:33 AM

Bollywood Actor : "मी आयुष्यात त्या टप्प्यावर पोहोचलोय", म्हणत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा सोशल मीडियाला रामराम

सिनेसृष्टीतून मोठी बातमी येत आहे. बॉलिवूड तसेच टेलिव्हिजनचे 60 वर्षीय स्टार रोनित रॉय यांनी सोशल मीडिया सोडल्याची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.

bollywood actor  quotमी आयुष्यात त्या टप्प्यावर पोहोचलोयquot म्हणत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा सोशल मीडियाला रामराम

सिनेसृष्टीतून मोठी बातमी येत आहे. बॉलिवूड तसेच टेलिव्हिजनचे 60 वर्षीय स्टार रोनित रॉय यांनी सोशल मीडिया सोडल्याची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये चाहत्यांना त्यांच्या सोशल मीडियापासून दूर राहण्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की, "तथापि, मी आयुष्यात त्या टप्प्यावर पोहोचलो आहे जिथे मला माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी एक नवीन मार्ग तयार करायचा आहे. असा मार्ग जो मला एक चांगला माणूस आणि अभिनेता बनवेल, तसेच नातेसंबंधांमध्ये पुढे जाण्याची संधी देईल. पूर्णपणे डिजिटल अलगाव मला मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अधिक सक्षम बनवण्यात आणि एक नवीन ‘मी’ शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे, ज्याला तुम्ही आणखी जास्त पसंत कराल अशी आशा आहे. किती काळ, हे निश्चित नाही. कृपया सोशल मीडियावर माझ्या अनुपस्थितीबद्दल मला माफ करा."

हेही वाचा- Shaharukh Khan On Terror Attack : दहशतवादी हल्ल्यांवर शाहरूख खानने केलं भाष्य, म्हणाला, 'भारताला कोणतीही गोष्ट हादरवू शकत नाही'

दरम्यान हे पहिल्यांदाच नाही की रोनित यांनी सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याची घोषणा केली आहे. रोनित रॉय आता डिजिटल डिटॉक्स करणार आहे. त्यांच्यासोबत 2025 मध्ये बरेच काही घडले असून त्यांनी मानसिकदृष्ट्या सोशल मीडियापलीकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. यापुर्वी देखील त्यांनी 2017 मध्येही अभिनेत्याने वैयक्तिक कारणास्तव फेसबुकपासून ब्रेक घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 2020 मध्ये केलेल्या एका पोस्टमध्ये सोशल मीडिया सोडण्याची घोषणा केली होती आणि त्यांना हे किती काळ टिकवता येईल हे माहित नाही.  यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे की, चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल ते खूप आभारी आहेत. चाहत्यांकडून मिळालेले प्रेम आणि सन्मान त्यांच्यासाठी खूप काही आहे. परंतु मानसिक आरोग्याच्या कारणास्तव ते सोशल मीडिया सोडू इच्छितात. 


सम्बन्धित सामग्री