मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या धाकट्या मुलाला प्राण्यांवर खूप प्रेम आहे. वंताराच्या स्थापनेवरून ते दिसून येते. दरम्यान, आता अंबानी कुटुंबावर दु:खाचा डोंगर ढासळल्याची बातमी समोर येत आहे. अंबानी कुटुंबियांचा पाळीव कुत्रा हॅपी अंबानीचा मृत्यू झाला आहे. अनंत अंबानी त्यांच्या पाळीव कुत्र्याची खूप काळजी घेत असत, पण आता त्यांचा आवडता कुत्रा या जगात राहिला नाही. अंबानी कुटुंबाने कुत्र्याच्या मृत्यूसंदर्भात माहिती दिली आहे. त्यांचा पाळीव कुत्र्या हॅपीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हॅपी अंबानी कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग होता. कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे, तोही प्रत्येक उत्सवात सहभागी होत असे.
अनंत अंबानींच्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू -
अनंत अंबानी यांच्या पाळीव कुत्र्याच्या हॅपीच्या मृत्यूची माहिती व्हायरल भयानी यांच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आली आहे. शेअर केलेल्या पोस्टनुसार, अनंत अंबानी यांचा पाळीव कुत्रा हॅपीचे 30 एप्रिल रोजी निधन झाले. कुटुंबाने त्यांच्या लाडक्या हॅपी अंबानी यांना श्रद्धांजली वाहिली, ज्यांना ते घरातील सर्वात प्रिय सदस्यांपैकी एक मानत होते. अंबानी कुटुंबाच्या कौटुंबिक फोटोंमध्ये, लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये आणि कौटुंबिक मेळाव्यांमध्ये हॅप्पीचे विशेष स्थान होते. हॅपीच्या निधनानंतर, अंबानी कुटुंबानेही एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा - बॉलिवूड गायक बादशाह विरोधात गुन्हा दाखल! काय आहे प्रकरण? वाचा
अंबानी कुटुंबाची हॅपीसाठी भावनिक पोस्ट -
अंबानी कुटुंबाने हॅप्पीच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यात लिहिले आहे की, 'प्रिय हॅपी, तू नेहमीच आमचा भाग राहशील आणि आमच्या हृदयात राहशील.' आता अंबानी कुटुंबाचे चाहतेही यावर प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, 'या कठीण काळात देव अंबानी कुटुंबाला धीर देवो.'
हेही वाचा - भारतात हानिया आमिर, माहिरा खानसह अनेक पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाउंट ब्लॉक
दरम्यान, अनंत अंबानी यांना त्यांच्या पाळीव कुत्र्याच्या मृत्यूमुळे खूप दुःख झाले आहे. हॅपी अनंत अंबानींच्या खूप जवळचा होता. अनंत आणि राधिकाच्या लग्नादरम्यान आलेल्या अंबानी कुटुंबाच्या फोटोमध्ये हॅपी देखील दिसत होता. हॅपी त्यांच्या कुटुंबाचा एक भाग होता.