Battle of Galwan Teaser : सलमान खानच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त फॅन्सना खास गिफ्ट, ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित

टीझरमध्ये सलमान खान एका धाडसी भारतीय लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. कपाळावरून वाहणारे रक्त, चेहऱ्यावर देशभक्तीचे भाव आणि डोळ्यांतील अंगार प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो.

Battle of Galwan Teaser : सलमान खानच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त फॅन्सना खास गिफ्ट, ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित

Battle of Galwan Teaser : बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान आज आपला 60 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास निमित्ताने सलमानने आपल्या चाहत्यांना एक जबरदस्त भेट दिली आहे. त्याच्या बहुप्रतिक्षित ‘बॅटल ऑफ गलवान’ (Battle of Galwan) या चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा शक्तिशाली टीझर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम करणारा हा चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लष्करी गणवेशात सलमानचा प्रभावी अवतार

टीझरमध्ये सलमान खान एका धाडसी भारतीय लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. कपाळावरून वाहणारे रक्त, चेहऱ्यावर देशभक्तीचे भाव आणि डोळ्यांतील अंगार प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. खडकाळ भूभाग आणि उंचावरील युद्धाच्या क्रूर वास्तवाचे चित्रण या टीझरमध्ये अत्यंत प्रभावीपणे करण्यात आले आहे. शत्रूची वाट पाहणारा सलमानचा हा अवतार त्याच्या आतापर्यंतच्या सर्वात धाडसी भूमिकांपैकी एक मानला जात आहे.

हेही वाचा – Drishyam 3: ‘यश त्याच्या डोक्यात गेलयं…’; अक्षय खन्नाच्या दृश्यम 3 मधून बाहेर पडण्यावर निर्माते कुमार मंगत यांचा संताप

वास्तववादी कथा आणि दमदार पार्श्वसंगीत

हा चित्रपट गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमधील ऐतिहासिक संघर्षावर आधारित आहे. भारतीय सैन्याच्या धैर्याची आणि बलिदानाची कथा सांगणाऱ्या या टीझरला हिमेश रेशमिया यांच्या दमदार पार्श्वसंगीताची साथ लाभली आहे. तसेच, प्रसिद्ध गायक स्टेबिन बेन यांचा आवाज टीझरची भव्यता अधिक वाढवतो.

हेही वाचा – Year Ender 2025: शाहरुख खानचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार, तर आशीष बेंडे यांना सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा सन्मान; 2025 मध्ये चित्रपटसृष्टीतील कोण कोण ठरले राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी?

मुख्य भूमिका आणि दिग्दर्शन

‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया यांनी केले असून, ‘सलमान खान फिल्म्स’च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. टीझरसोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली असून, चाहत्यांमध्ये आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number