बॉलीवूडचे ज्येष्ठ विनोदी कलाकार सतीश शाह यांचे शनिवारी, मूत्रपिंडाच्या आजारामुळे निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. सतीश शाह यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीत शोककळा पसरली. दरम्यान, सतीश शाह यांच्या लोकप्रिय साराभाई वर्सेस साराभाई मालिकेतील कलाकार सुमीत राघवन यांनी भावनिक पोस्ट करत सतीश शाह यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सुमीत राघवन यांनी त्यांच्या आणि सतीश शाह यांच्या नात्याबाबत चाहत्यांना सांगितले की, ते जेव्हाही भेटायचे तेव्हा सुमीत किंवा सतीश शाह म्हणून नाही, तर साहील आणि डॅड (इंद्रवधन) म्हणून भेटायचे. त्यामुळे आताही मोठा मुलगा या नात्याने सर्व चाहत्यांची श्रद्धांजली स्वीकरत आहे, असे सुमीत यांनी नमूद केले.