Chhaava OTT Release Date: विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'छावा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रेम मिळाले. तसेच समीक्षकांनी देखील चित्रपटाचे कौतुक केले. आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सवर त्याच्या रिलीजबद्दल अफवा पसरल्या असताना, आता ओटीटी प्लॅटफॉर्मने अखेर याबद्दल अधिकृत घोषणा केली आहे. गुरुवारी, नेटफ्लिक्स आणि मॅडॉक फिल्म्सने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून 'छावा'च्या ओटीटी रिलीज डेटची घोषणा केली.
छावा ओटीटी रिलीज तारीख -
नेटफ्लिक्सने गुरुवारी याची अधिकृत घोषणा केली. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, 'काळाच्या ओघात कोरलेली धाडस आणि अभिमानाची कहाणी पहा. 11 एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर 'छावा' पहा.' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 219.25 कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात 180.25 कोटी, तिसऱ्या आठवड्यात 84.05 कोटी आणि चौथ्या आठवड्यात 55.95 कोटींची कमाई केली.
हेही वाचा - Chhaava Box Office Collection Day 40 : छावाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड, पठाण, अॅनिमल आणि ''गदर २''लाही टाकलं मागे
दरम्यान, 'छावा' बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत राहिला, तर जॉन अब्राहमचा 'द डिप्लोमॅट' त्याला आव्हान देण्यात अपयशी ठरला. हा सस्पेन्स थ्रिलर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल अशी अपेक्षा होती पण छावासमोर त्याची गती मंदावली. 'छावा' हा चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटात, विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत जीवंतपणा आणला आहे.
हेही वाचा - औरंगजेबाची कबर फोडणाऱ्याला 5 बिघा जमीन आणि 11 लाख रुपये देण्याची घोषणा कोणी केली? ''त्या'' व्यक्तीचा शिवसेनेशी आहे खास संबंध
याशिवाय, दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, विनीत कुमार सिंग आणि दिव्या दत्ता यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर खोलवर छाप सोडली. तथापी, छावा चित्रपटानंतर महाराष्ट्रात मुघल शासक औरंगजेबाच्या कबरीवरून बराच वाद पेटला होता. तसेच अनेक हिंदू संघटनांनी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली होती.