Bigg Boss Marathi 6 :’बिग बॉस’च्या घरात त्याची एन्ट्री होणार? नवीन Wild Card एन्ट्रीचा प्रोमो पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकतेची लाट

मराठी मनोरंजन क्षेत्रात सध्या मराठी बिग बॉस मोठ्या प्रमाणात लोकांच्या पसंतीस पडत आहे. राखीपाठोपाठ आता सहाव्या आठवड्यानंतर आणखी एक वाइल्ड कार्ड एंट्रीची जोरदार चर्चा सुरु आहे.

Bigg Boss Marathi 6 :’बिग बॉस’च्या घरात त्याची एन्ट्री होणार? नवीन Wild Card एन्ट्रीचा प्रोमो पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकतेची लाट

मराठी मनोरंजन क्षेत्रात सध्या मराठी बिग बॉस मोठ्या प्रमाणात लोकांच्या पसंतीस पडत आहे. बिग बॉस मराठी सिझन 6 च्या घरात पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री झाल्यानंतर ‘बिग बॉस’ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ही वाइल्ड कार्ड एन्ट्री अभिनेत्री राखी सावंतची झाली असून तिने नागिण’ अवतारात घरात प्रवेश केला. पहिल्या दिवसापासून तिचा ड्रामा सुरू झाला असून तिने घरातील इतर सदस्यांना सळो की पळो करून सोडलं.

राखीची एक्झिट की नवा ट्विस्ट?

एकीकडे राखीचा हा भावनिक चेहरा दिसत असतानाच, दुसऱ्या एका प्रोमोमध्ये बिग बॉस तिच्यावर प्रचंड नाराज असल्याचे दिसत आहे. घरातील तोडफोड आणि नियमांचे उल्लंघन केल्यामुळे राखीला कन्फेशन रूममध्ये बोलावण्यात आले असून, तिला घराबाहेर काढले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. 16 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झालेल्या या हाय-व्होल्टेज ड्राम्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा- Bigg Boss Marathi 6 : ड्रामाक्वीन राखी सावंत रडली, प्रभूला मिठी मारत झाली भावूक; तन्वीशी ताटातूट केल्यानंतर खेळतेय माईंड गेम

बिग बॉसच्या प्रोमोनंतर वाइल्ड कार्ड एंट्रीची जोरदार चर्चा
राखीपाठोपाठ आता सहाव्या आठवड्यानंतर आणखी एक वाइल्ड कार्ड एंट्रीची जोरदार चर्चा सुरु आहे. अलिकडेच बिग बॉस मराठीच्या आणि कलर्स मराठीच्या सोशल मीडियावर याबाबतची एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या एक वादळी वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याचे संकेत स्वतः बिग बॉसने दिले आहेत. बिग बॉसने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये असं म्हटलं की, “अस्सल स्वॅग, कडक वाइब्स, लूक झकास, मराठमोळा खास, फक्त तुमच्यासाठी लवकरच…” तसेच कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, “महाराष्ट्राच्या मातीतलं, अस्सल मराठमोळं! येतंय महाराष्ट्राचं तुफान लवकरच…” या प्रोमोनंतर चाहत्यांनी अंदाज लावायला सुरुवात केली आहे.

अभिजीत बिचुकलेचा बिग बॉसच्या घरात कमबॅक

यादरम्यान असा अंदाज बांधला जातोय की, राखीनंतर तिला टक्कर देण्यासाठी अभिजीत बिचुकले यांना संधी देण्यात येऊ शकते. अभिजीत बिचुकले हे एक राजकीय नेते आहेत. बिग बॉस मराठी 2 नंतर बिग बॉस 15 मध्ये त्यांनी हिंदी बिग बॉसमध्ये त्यांनी आपल्या शैलीत प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. हिंदी आणि मराठी दोन्ही बिग बॉसमध्ये त्यांचा जलवा पाहायला मिळाला आहे. आता ते बिग बॉस मराठी 6 मध्ये येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. नवीन वाइल्ड एंट्री आणि तो सदस्य कोण असू शकतो याबद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number