Pranit More Controversy : एक वाद संपत नाही तोच दुसरा पेटला! बिर्याणीनंतर MBBS विद्यार्थिनीचा पुरुष मृतदेहाच्या खाजगी अवयवांवरील टिप्पणी व्हायरल

कॉमेडियन प्रणित मोरेच्या प्रेक्षकांसमोर सादर होणाऱ्या कार्यक्रमांबद्दलची चर्चा थांबण्याचे नाव घेत नाही. एक वाद संतप नाही तोपर्यंत प्रणित मोरेच्या शोमधील आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.

Pranit More Controversy : एक वाद संपत नाही तोच दुसरा पेटला! बिर्याणीनंतर MBBS विद्यार्थिनीचा पुरुष मृतदेहाच्या खाजगी अवयवांवरील टिप्पणी व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून, कॉमेडियन प्रणित मोरेच्या प्रेक्षकांसमोर सादर होणाऱ्या कार्यक्रमांबद्दलची चर्चा थांबण्याचे नाव घेत नाही. नुकताच स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोमधील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. ज्यात एका तरुणाने त्यांच्या जोडीदाराला 370 रुपयांची बिर्याणी खाऊ घातली आणि 370 रुपयांच्या बिर्याणीवरून अत्यंत आक्षेपार्ह आणि असंवेदनशील वक्तव्य केलं. यात त्याने त्याच्या जोडीदाराकडून अपेक्षा केली की त्याने तिच्यावर 370 रुपयांचा खर्च केला आहे, तर तो ते पैसे वसूल करण्यासाठी तिच्या संमतीशिवाय तिच्यासोबत काहीही वागू शकतो.

या त्याच्या विधानाने सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात होता. हा वाद संतप नाही तोपर्यंत प्रणित मोरेच्या शोमधील आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. हिमांशू जांगराच्या 370 रुपयांच्या बिर्याणी प्रकरणानंतर एमबीबीएस विद्यार्थिनीने पुरुषाच्या मृतदेहाच्या खाजगी अवयवांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. 

हेही वाचा- Pranit MOre Viral Topic : 370 ची बिर्याणी चांगलीच महागात पडली! स्वत:चं इंस्टा अकाउंट कराव लागलं डीअ‍ॅक्टिव्हेट

प्रणित मोरेच्या शोमधील आणखी एक क्लिप समोर
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सेजल पवार या विद्यार्थिनीने केलेल्या विधानाकडे लक्ष वेधले गेले. सेजल पवार या एमबीबीएस पदवीधर इन्फ्लुएन्सर तरुणीने मृतदेहांच्या खाजगी अवयवांच्या आकाराबाबत टिप्पणी केली. सेजल पवार या तरुणीने मृत पुरुष शरीरांसंदर्भात तिने आणि तिच्या काही सहकाऱ्यांनी केलेल्या चर्चाबद्दल सांगितले.

यावेळी ती म्हणाली की, शवविच्छेदन प्रयोगशाळेत त्यांनी पुरुष मृतदेहांच्या जननेंद्रियांच्या आकारांची तुलना केली, यावरून त्यांनी विनोद केला. शवविच्छेदन प्रयोगशाळेतील खाजगी अवयवांच्या तुलनेबाबतच्या या विधानामुळे वैद्यकीय नीतिमत्ता आणि मृतदेहांच्या अपमानावरून मोठा वाद निर्माण झाला. तिने केलेलं हे विधान व्हायरल होताच अनेक लोकांनी या वादावरील प्रतिक्रियेची तुलना अलीकडील हिमांशू जांगरा प्रकरणानंतर झालेल्या विरोधाशीही केली.

हेही वाचा- Alia's Alpha Film Teaser : आलियाचा 'अल्फा' फ्रेंच थ्रिलर 'ला फेम निकिता'ची नक्कल? नेटकऱ्यांनी शोधले दृष्यांमधील साम्य; व्हिडीओ व्हायरल

प्रकरण अंगाशी येताच सेजल पवारने मागितली माफी 
सेजल पवार या विद्यार्थिनीने केलेल्या विधानानंतर सोशल मीडियावरून तिच्यावर जोरदार टीका केली जात होती. त्यानंतर लगेचच तिने माफी मागत म्हटले की, "अलीकडेच प्रसारित होत असलेल्या एका व्हिडिओमधील क्लिपबद्दल मला खरोखरच बोलायचे आहे. तो व्हिडिओ पुन्हा पाहिल्यावर, माझ्या बोलण्यामुळे लोक का नाराज झाले हे मला पूर्णपणे समजले आहे. हा एक संवेदनशील विषय आहे आणि माझी टिप्पणी ज्या प्रकारे व्यक्त व्हायला नको होती, तशी ती झाली. कोणाचाही अनादर करण्याचा माझा कधीच हेतू नव्हता, पण मला हे मान्य आहे की हेतूपेक्षा परिणाम अधिक महत्त्वाचा असतो".

"जे बोलले गेले त्याचे समर्थन करण्यासाठी किंवा त्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी मी येथे आलेले नाही. मी त्याची जबाबदारी घेते. आता मागे वळून पाहताना, मला जाणवते की माझ्या शब्दांचा अर्थ माझ्या म्हणण्यापेक्षा वेगळ्या प्रकारे कसा घेतला गेला. यामुळे त्यांना, विशेषतः संवेदनशील विषयांवर चर्चा करताना, आपण संवाद कसा साधतो यावर चिंतन करण्यास प्रवृत्त केले. एक विद्यार्थिनी म्हणून हा माझ्यासाठी एक शिकण्याचा अनुभव ठरला आहे"

"यामुळे मला माझ्या संवाद साधण्याच्या पद्धतीवर चिंतन करायला लावले आहे, विशेषतः जेव्हा अधिक विचार आणि संवेदनशीलतेची गरज असलेल्या विषयांवर चर्चा करायची असते. त्या क्लिपमुळे जे कोणी निराश किंवा दुखावले गेले असतील, त्यांना सांगू इच्छिते की, काय चुकले हे मला समजले आहे आणि त्याबद्दल मी मनापासून दिलगीर आहे. तसेच, अशी घटना पुन्हा कधीही घडू देणार नाही" असं म्हणत सेजलने माफी मागितली आणि त्यानंतर तिचे इंस्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट केले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number