Amitabh Bachchan Mobbed: गोंधळातही बिग बींचा संयम! सुरतमध्ये चाहत्यांच्या गर्दीत अडकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी जे केलं, त्याचं होतंय कौतुक

एकीकडे क्रिकेटचा उत्सव आणि दुसरीकडे बिग बींची झलक पाहण्यासाठी उसळलेली चाहत्यांची गर्दी, यामुळे सूरतमध्ये ISPL 2026 ची सुरुवातच प्रचंड चर्चेत झाली आहे.

Amitabh Bachchan Mobbed: गोंधळातही बिग बींचा संयम! सुरतमध्ये चाहत्यांच्या गर्दीत अडकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी जे केलं, त्याचं होतंय कौतुक

सूरत: हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन पुन्हा एकदा चाहत्यांच्या प्रचंड प्रेमामुळे चर्चेत आले आहेत. शुक्रवारी (9 जानेवारी 2026) सूरत विमानतळावर त्यांचे आगमन होताच चाहत्यांनी अक्षरशः गर्दी केली आणि काही काळ परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन विमानतळाच्या परिसरात चाहत्यांनी घेरलेले दिसत आहेत. चाहत्यांकडून सतत फोटो काढण्याचा प्रयत्न होत असल्याने त्यांना चालणेही कठीण झाले होते. सुरक्षारक्षक आणि स्थानिक पोलीस गर्दी आवरण्याचा प्रयत्न करत होते, मात्र चाहत्यांचा उत्साह आटोक्यात येत नव्हता. या गोंधळातही बिग बी शांत आणि संयमी दिसले. त्यांनी चाहत्यांकडे हात दाखवत अभिवादन केले आणि हळूहळू आपल्या गाडीकडे रवाना झाले.

हेही वाचा: PM Narendra Modi: सोमनाथमध्ये ‘स्वाभिमान पर्व’: 108 अश्व, 72 तास अखंड जप आणि भव्य ड्रोन शो; पंतप्रधान मोदींचा तीन दिवसीय गुजरात दौरा

83 वर्षांचे अमिताभ बच्चन सध्या सूरतमध्ये Indian Street Premier League (ISPL) सीझन 3 साठी उपस्थित आहेत. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार असून, या लीगमध्ये देशभरातील स्ट्रीट क्रिकेट संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे. या महिनाभर चालणाऱ्या स्पर्धेत 44 सामने खेळवले जाणार आहेत.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी चाहत्यांच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली. “ते 83 वर्षांचे आहेत, कृपया त्यांना थोडी मोकळी जागा द्या,” अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात उमटल्या. अनेक युजर्सनी सेलिब्रिटी हेही माणूसच असतात, त्यांच्या सुरक्षिततेचा आणि वैयक्तिक अवकाशाचा आदर केला पाहिजे, असे मत मांडले.

ISPL 2026 स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे मोठ्या सेलिब्रिटींची उपस्थिती. अमिताभ बच्चन यांचा संघ ‘माझी मुंबई’ हा गतविजेता असून, या हंगामातील पहिल्या सामन्यात त्यांचा सामना ‘श्रीनगर के वीर’ संघाशी होणार आहे. उद्घाटन सोहळ्यात अभिनेता अक्षय कुमार हेलिकॉप्टरद्वारे प्रवेश करणार असून, रूपाली गांगुली सूत्रसंचालन करणार आहेत. याशिवाय सैफ अली खान, करीना कपूर, अजय देवगण, राम चरण, हृतिक रोशन, सचिन तेंडुलकर आणि सलमान खान यांसारखे अनेक सेलिब्रिटी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

एकीकडे क्रिकेटचा उत्सव आणि दुसरीकडे बिग बींची झलक पाहण्यासाठी उसळलेली चाहत्यांची गर्दी, यामुळे सूरतमध्ये ISPL 2026 ची सुरुवातच प्रचंड चर्चेत झाली आहे.

हेही वाचा: Gulshan Kumar’s Shooter Dies : गुलशन कुमार यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा तुरुंगात मृत्यू; अंडरवर्ल्डच्या सांगण्यावरून झाडल्या होत्या 16 गोळ्या

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number