‘मराठी माणसाचा तिरस्कार करणं बंद करा…’; नाना पाटेकरांच्या अंत्यसंस्काराला बॉलीवूड अनुपस्थित राहिल्याने अमोल मिटकरी आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी बॉलीवूडच्या या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले.

‘मराठी माणसाचा तिरस्कार करणं बंद करा…’; नाना पाटेकरांच्या अंत्यसंस्काराला बॉलीवूड अनुपस्थित राहिल्याने अमोल मिटकरी आक्रमक
Nana Patekar, Nana Patekar

बॉलीवूड तसेच मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाचा आणि आक्रमक शैलीचा वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी गोव्यात निधन झाले. गोव्यातील निवासस्थानी त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना तातडीने मणीपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय पथकाने आणि कर्करोग विभाग प्रमुख डॉ. शेखर सालकर यांनी जवळपास 45 मिनिटे सतत ‘सीपीआर’ (CPR) व कार्डियाक मसाज देऊन त्यांना वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला.

उपचारांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने पहाटे 5.20 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी वार्तेने संपूर्ण कलाविश्व आणि चाहत्यांवर शोककळा पसरली. त्यानंतर उशिरा रात्री पुण्याजवळील डोणजे गावातील त्यांच्या फार्महाऊसवर शासकीय सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यसंस्काराला हिंदी अभिनेत्यांच्या गैरहजेरीवरून मिटकरींचा सवाल

नाना पाटेकर यांच्या अंत्यसंस्काराला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली; मात्र हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रमुख कलाकारांच्या अनुपस्थितीवरून राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी बॉलीवूडच्या या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले.

हेही वाचा – “…तर कायदेशीर कारवाई करणार” नाना पाटेकरांचे निधन हार्ट अटॅकने, मग गोवा पोलिसांकडून गुन्हा दाखल का? नेमकं प्रकरण काय?

“नानांचा साधेपणा, मातीशी असलेले घट्ट नाते आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘नाम फाउंडेशन’द्वारे केलेले कार्य चार भिंतीच्या आत राहणाऱ्या बॉलीवूड कलाकारांच्या डोळ्यात खुपत होते का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच बॉलीवूडच्या काही मंडळींनी मराठी माणसाचा द्वेष करणे थांबवावे, अशी टीका करत अंत्यसंस्काराला न येता केवळ सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहणाऱ्या मुंबई-पुण्यातील कलाकारांनाही त्यांनी खडे बोल सुनावले.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number