Apurva Nemlekar: ‘शेवंताची’ नवी इनिंग! अपूर्वा नेमळेकरने गुपचूप लग्न करत चाहत्यांना दिलं सरप्राईज

मराठी टीव्ही अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरने व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तनुज गोवलकरसोबत विवाह केला.

Apurva Nemlekar:  ‘शेवंताची’ नवी इनिंग! अपूर्वा नेमळेकरने गुपचूप लग्न करत चाहत्यांना दिलं सरप्राईज

Apurva Nemlekar: मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. 14 फेब्रुवारी 2026 रोजी, म्हणजेच व्हॅलेंटाइन डेच्या दिवशीच, अपूर्वाने आपल्या आयुष्याच्या जोडीदारासोबत विवाहबंधनात अडकत प्रेमाला अधिकृत नाव दिले. सोशल मीडियावर लग्नाचे खास फोटो शेअर करत तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

झी मराठीवरील गाजलेल्या रात्रीस खेळ चाले या मालिकेत ‘शेवंता’ हे नकारात्मक पण लक्षवेधी पात्र साकारत अपूर्वा घराघरात पोहोचली. तिच्या अभिनयामुळे ‘शेवंता’ या भूमिकेचा स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण झाला. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत असतानाच अपूर्वाने आपल्या सरळ, स्पष्ट आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्वामुळेही प्रेक्षकांची मने जिंकली.

याशिवाय, बिग बॉस मराठी 4 या पर्वात उपविजेती ठरल्यामुळे अपूर्वाची लोकप्रियता आणखी वाढली. बिग बॉसच्या घरात तिने दाखवलेली संयमशीलता, प्रामाणिकपणा आणि ठाम भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

लग्नानंतर शेअर केलेल्या भावनिक पोस्टमध्ये अपूर्वाने लिहिले की, आयुष्याने तिला अनेकदा कसोटीला लावले, तोडले आणि पुन्हा घडवले. मात्र, तिने प्रेमावरचा विश्वास कधीही सोडला नाही. अनेक वादळांनंतर देवाने तिला शांतता आणि सहवास दिला, असे सांगत तिने आपल्या नव्या आयुष्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आता ती अधिकृतपणे ‘श्रीमती अपूर्वा तनुज गोवलकर’ झाली असल्याचे तिने अभिमानाने नमूद केले.

विशेष म्हणजे, अपूर्वा आणि तिचा पती तनुज यांनी याआधीही एक खास फोटोशूट केले होते, ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती. त्या फोटोंवर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिनेही प्रेमळ प्रतिक्रिया दिली होती.

चाहत्यांसाठी अपूर्वाचे हे नवे पर्व आनंदाची बातमी ठरली असून, सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनयाच्या यशस्वी प्रवासानंतर आता वैयक्तिक आयुष्यातही तिने स्थैर्य आणि प्रेमाचा नवा अध्याय सुरू केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number