Ashlesha Thakur: मुंबईत नुकत्याच झालेल्या ‘द फॅमिली मॅन 3’च्या ट्रेलर लॉन्चदरम्यान एक अनपेक्षित क्षण घडला. मंचावर सर्व कलाकार उपस्थित असताना स्टेजवरून खाली उतरण्याच्या वेळेस एका अभिनेत्रीचा तोल गेला आणि ती थेट पायऱ्यांवर पडली. हा प्रसंग उपस्थित रिपोर्टर्स आणि पापाराझींकडून कॅमेरात कैद करण्यात आला आणि त्याची क्लिप काहीच मिनिटात समाजमाध्यमांवर वायरल झाली.
या सीझनमध्ये मनोज वाजपेयीच्या स्क्रीनवरच्या मुलीची भूमिका करणारी अभिनेत्री ‘अश्लेषा ठाकूर’ या अपघाताचा केंद्रबिंदू होती. स्टेजवरून खाली उतरताना तिचे पाऊल चुकले आणि हाय-हील मुळे तिचा बॅलन्स बिघडला. काही क्षणांतच ती जोरात पायऱ्यांवर बसली. तिच्या अगदी शेजारी असलेल्या प्रियमणीने ताबडतोब तिला हात देऊन उठवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर अभिनेता शारिब हाश्मीनेही धाव घेत मदत केली. त्या क्षणी काही सेकंदांसाठी सगळ्यांना धक्का बसला आणि प्रेक्षकांतून आश्चर्याचे आवाजही ऐकू आले.
या इव्हेंटसाठी अश्लेषाने ब्लॅक स्ट्रॅपलेस आउटफिट घातला होता. पडण्याच्या क्षणी हा ड्रेस सरकण्याची शक्यता असल्यामुळे प्रियमणी आणि स्टेजवरील बाकी टीमने ताबडतोब तिला कव्हर केलं. त्यामुळे मोठी एम्बॅरेसमेंट टळली. काही मिनिटं बसून थोडंसं स्वत:ला सावरल्यानंतर अश्लेषा पुन्हा हसून उभी राहिली आणि इव्हेंटच्या बाकी कार्यक्रमात सामीलही झाली.
हा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड झाल्यानंतर फॅन्सनी मोठ्या प्रमाणात रिऍक्शन्स दिल्या. काहींनी थेट चिंता व्यक्त केली ‘ती बारी आहे का’ तर काही युजर्सनी हाय-हील्सला टार्गेट करत कमेंट्स केल्या ‘कम्फर्टेबल वाटत नसेल तर हाय हिल्स का घालायच्या’ तर काहींनी म्हटलं इव्हेंटमध्ये स्टाइल आणि लुक प्रेशरमुळे मुली खूप असुरक्षित शूज घालतात… आणि त्याचा धोका नेहमी असतो.
या अनपेक्षित क्षणामुळं ट्रेलर लाँचच्या सेलिब्रेशनपेक्षा या ‘फॉल मोमेंट’ची जास्त चर्चा झळकली. मात्र सेटवर, इव्हेंटमध्ये तिच्या टीममेट्सनी ताबडतोब घेतलेली अॅक्शन प्रेक्षकांना भावली.
‘द फॅमिली मॅन’चा पुढचा सीझन प्राइम व्हिडिओवर 21 नोव्हेंबर 2025 पासून उपलब्ध होणार आहे. मनोज वाजपेयीच्या या लोकप्रिय स्पाय-थ्रिलर सीरिजबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. पण या इव्हेंटने एक गोष्ट पुन्हा स्पष्ट केली शो चा ट्रेलर ट्रेंड होण्याआधी अभिनेत्रीच्या पडण्याचा क्लिपच फॅन्सच्या रिस्पॉन्समध्ये सध्या नंबर वन बनला आहे!