विराट कोहलीच्या एका लाईकमुळे अवनीत कौरचे नशीब उजळले! इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये 20 लाखांची वाढ

क्रिकेट सुपरस्टार विराट कोहलीने अभिनेत्री अवनीत कौरचा इंस्टाग्राम फोटो लाईक केल्याच्या बातमीने इंटरनेटवर खळबळ उडाली. ही छोटीशी 'लाइक' अवनीतसाठी एक मोठी संधी बनली.

विराट कोहलीच्या एका लाईकमुळे अवनीत कौरचे नशीब उजळले! इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये 20 लाखांची वाढ
Edited Image

मुंबई: सोशल मीडियाच्या जगात एका लाईकमुळे किती मोठी खळबळ उडवू शकते याचे ताजे उदाहरण आता समोर आले आहे. क्रिकेट सुपरस्टार विराट कोहलीने अभिनेत्री अवनीत कौरचा इंस्टाग्राम फोटो लाईक केल्याच्या बातमीने इंटरनेटवर खळबळ उडाली. ही छोटीशी 'लाइक' अवनीतसाठी एक मोठी संधी बनली. 

विराट कोहलीने दिले स्पष्टीकरण  – 

अवनीत कौरच्या एका फोटोवर विराट कोहलीचे नाव लाईकर्सच्या यादीत दिसले, त्यानंतर सोशल मीडियावर अफवा आणि मीम्सचा पूर आला. काही वापरकर्त्यांनी असे म्हटले की हे जाणूनबुजून केले गेले आहे, तर काहींनी विराटची पत्नी अनुष्का शर्माला टॅग करून प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. हे प्रकरण इतके वाढले की विराट कोहलीला स्वतः पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावे लागले.

हेही वाचा – Met Gala 2025: शाहरुख, प्रियांकासह 'हे' स्टार्स रेड कार्पेटवर दाखवणार जलवा! कधी आणि कुठे आयोजित करण्यात येणार फॅशन इव्हेंट?

अवनीत कौरचे इंस्टाग्राम फॉलोअर्स वाढले – 

कोहलीने त्याच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की 'लाइक' हे इंस्टाग्रामच्या ऑटो-सजेशन अल्गोरिथममुळे झाले आणि त्यामागे त्याचा कोणताही वैयक्तिक हेतू नव्हता. विराटने फॉलोवर्सना हे प्रकरण वाढू न देता येथेचं संपवा, असं आवाहन केलं,  पण दरम्यान, हा संपूर्ण वाद अवनीत कौरसाठी सुवर्णसंधीमध्ये बदलला. रिपोर्ट्सनुसार, वाद सुरू होण्यापूर्वी अवनीतचे इंस्टाग्रामवर सुमारे 30 दशलक्ष फॉलोअर्स होते, तर आता तिचे फॅन फॉलोअर्स 31.8 दशलक्षांवर पोहोचले आहेत. याचा अर्थ असा की या संपूर्ण भागात तिच्या फॉलोअर्समध्ये सुमारे 20 लाखांनी वाढ झाली आहे.

हेही वाचा – भारतात हानिया आमिर, माहिरा खानसह अनेक पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाउंट ब्लॉक

अवनीत कौरला विराटच्या लाईकचा फायदा  – 

दरम्यान, सोशल मीडिया तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की अशा वादांमुळे काही काळ टीका होत असली तरी प्रसिद्धीच्या बाबतीत असे प्रकरण सेलिब्रिटींसाठी फायदेशीर ठरतात. अवनीत कौर ही  एक यशस्वी टीव्ही अभिनेत्री, नृत्यांगना आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर म्हणून ओळखली जाते. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स वाढल्याने मोठ्या ब्रँड आणि प्रोजेक्ट्सचे लक्ष अभिनेत्रीने वेधून घेतले आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number