Tuesday, May 20, 2025 04:22:55 PM

'बाहुबली' पुन्हा मोठ्या पडद्यावर राज्य करणार; निर्मात्याने जाहीर केली Re-Release ची तारीख

बाहुबली: द बिगिनिंग हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला. त्याचा दुसरा भाग बाहुबली 2 द कन्क्लुजन 1017 मध्ये मोठ्या पडद्यावर आला. बाहुबली 2 च्या प्रदर्शनाला आठ वर्षे झाली आहेत.

बाहुबली पुन्हा मोठ्या पडद्यावर राज्य करणार निर्मात्याने जाहीर केली re-release ची तारीख
Baahubali Re-Release
Edited Image, X

नवी दिल्ली: प्रभासच्या हिट चित्रपटांच्या यादीत बाहुबलीचे नाव सर्वात आधी घेतले जाते. एसएस राजामौली दिग्दर्शित ही फ्रँचायझी लोकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरली. बाहुबली: द बिगिनिंग हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला. त्याचा दुसरा भाग बाहुबली 2 द कन्क्लुजन 1017 मध्ये मोठ्या पडद्यावर आला. बाहुबली 2 च्या प्रदर्शनाला आठ वर्षे झाली आहेत. या निमित्ताने निर्मात्यांनी चित्रपटाच्या पुनर्प्रदर्शनाबाबत एक मोठी घोषणा केली आहे.

पीरियड अ‍ॅक्शन ड्रामा फ्रँचायझी बाहुबलीने बॉक्स ऑफिस कलेक्शनचे नवे विक्रमही प्रस्थापित केले. बाहुबली 2 हा अनेक वर्षे सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट राहिला. 2023 मध्ये, शाहरुखच्या पठाणने त्याचा कलेक्शन रेकॉर्ड मोडला. ओटीटीवरही चित्रपटप्रेमींकडून या चित्रपटाचे कौतुक झाले. बाहुबली भाग 2 ला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, निर्मात्याने बाहुबली पुन्हा प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. बॉलिवूड चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याच्या ट्रेंडला आव्हान देण्यासाठी प्रभासचा हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार आहे.

हेही वाचा - फुले ची दमदार एन्ट्री; 2 दिवसात 47 लाखांची कमाई

प्रभासचा 'बाहुबली 2' हा चित्रपट 28 एप्रिल 2017 रोजी प्रदर्शित झाला. 250 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने जगभरात 1800 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली, ज्यामुळे एसएस राजामौली दिग्दर्शित हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला.

हेही वाचा - जातीवाचक टिप्पणी करणं अनुराग कश्यपला भोवलं! न्यायालयाकडून समन्स जारी

प्रभासचा 'बाहुबली' पुन्हा कधी प्रदर्शित होणार - 

बाहुबली निर्माता शोबू यारलागड्डा यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिले की, 'तुम्हा सर्वांना ही माहिती देताना मला आनंद होत आहे की या वर्षी आम्ही बाहुबली चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची योजना आखत आहोत. हा चित्रपट पुन्हा एकदा भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या काळात जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या करण्याची संधी मिळेल. हा चित्रपट ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होण्याची योजना आहे.' 


सम्बन्धित सामग्री