Friday, April 25, 2025 10:11:27 PM

लग्न करण्यापूर्वी 'हे' मराठी चित्रपट पाहिल्याने होईल वैवाहिक जीवन सुखकर

मात्र, अनेकदा आपल्याला मित्र-मंडळींकडून अशा घटना ऐकायला मिळतात, ज्यामुळे आपण लग्न करावे की नाही? हा प्रश्न निर्माण होतो. बऱ्याचदा, नाते-संबंधित किंवा लग्नाविषयी अनेक चित्रपट आपल्याला पाहायला मिळतात.

लग्न करण्यापूर्वी हे मराठी चित्रपट पाहिल्याने होईल वैवाहिक जीवन सुखकर

सध्या, लग्नाचा सीझन सुरु आहे. अनेकजण लग्नबंधनात अडकत आहेत. मात्र, अनेकदा आपल्याला मित्र-मंडळींकडून अशा घटना ऐकायला मिळतात, ज्यामुळे आपण लग्न करावे की नाही? हा प्रश्न निर्माण होतो. बऱ्याचदा, नाते-संबंधित किंवा लग्नाविषयी अनेक चित्रपट आपल्याला पाहायला मिळतात. ज्यामध्ये आपल्याला लग्नासंबंधित अनेक महत्वाचे मुद्दे, जबाबदाऱ्या, आणि त्यातून होणाऱ्या परिणामांसंबंधित अनेक माहिती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे हे चित्रपट मनोरंजनासोबतच आपल्याला महत्त्वाचे धडेही देतात. अशाच काही मराठी चित्रपटांची यादी खाली दिली आहे.

1 -  चि. सौ. का. (2019):

हा चित्रपट लग्नाच्या संकल्पनेवर आधारित आहे. लग्नानंतर होणारे बदल, एकमेकांशी जुळवून घेण्याची पद्धत आणि नवरा-बायकोमधील मानसिक संघर्ष कशाप्रकारे असू शकतो, याबाबदल चि. सौ. का. चित्रपटाने उत्कृष्ट पद्धतीने दाखवला आहे. नात्यांमधील समजूतदारपणा, आणि त्यासोबत परस्पर विश्वास किती महत्त्वाचा आहे, हे आपल्याला चि. सौ. का. चित्रपट या चित्रपटातून ठळकपणे प्रेक्षकांच्या समोर येते. या चित्रपटात ललित प्रभाकर, मृण्मयी गोडबोले, भारत गणेशपुरे, सुप्रिया पाठारे, पुष्कर लोणारकर यांसारख्या अनुभवी कलाकारांनी या चित्रपटात काम केले आहे. आजच्या पिढीसाठी हा चित्रपट खूप फायदेशीर आहे. 


2 - मुंबई पुणे मुंबई (2010, 2015, 2018):

या चित्रपटाचे तीन भाग आहेत ज्यामध्ये हा चित्रपट प्रेम, नातेसंबंध आणि विवाहानंतरचे बदल यावर प्रकाश टाकते. पहिल्या भागात लग्न ठरवण्याआधी दोघांची विचारसरणी किती जुळते, हे तपासले जाते. दुसऱ्या भागात लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या, तर तिसऱ्या भागात मुलांच्या जन्मानंतर नात्यात येणारे बदल दाखवले आहेत. या चित्रपटातील कलाकारांनी उत्कृष्टपणे अभिनय केल्यामुळे आणि दिग्दर्शकाने कोणत्याही प्रकारचे व्हिजुअल इफेक्ट्स न वापरता एकदम साधेपणाने हा चित्रपट दर्शवला आहे. त्यामुळे हा चित्रपट आजच्या तरुण पिढीसाठी खास आहे.


3 - कट्यार काळजात घुसली (2015):

हा चित्रपट प्रत्यक्ष लग्नावर जरी आधारित नसला तरीदेखील नात्यांमधील संघर्ष, अहंकार, क्षमा, आणि समजूतदारपणाचा सुंदर धडा देणारा हा चित्रपट आहे, जो आपल्या वैवाहिक जीवनातही लागू होतो.


4 - ती सध्या काय करते? (2017):

प्रेम, ब्रेकअप आणि मग लग्नाच्या टप्प्यावर व्यक्तींसाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासोबतच खूप शिकवण देणारा चित्रपटही आहे. हा चित्रपट, जुन्या नाते-संबंधातून बाहेर पडून नवीन नातं स्वीकारायला शिकवतो. या चित्रपटात अंकुश चौधरी, अभिनय बेर्डे, आर्या अंबेकर, उर्मिला कोठारे अशा अनेक दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. 


5 - मुरांबा (2017):

आजच्या आधुनिक नातेसंबंधावर भाष्य करणारा हा चित्रपट लग्नाआधी प्रत्येकाने पाहावा असा आहे. हा चित्रपट आपल्याला नात्यातील गैरसमज, स्वतंत्र विचारसरणी आणि कुटुंबाचा हस्तक्षेप याबद्दलचा विचार करायला लावतो. या चित्रपटात अमेय वाघ, सचिन खेडेकर, मिथिला पालकर, चिन्मयी सुमित या सारख्या अनेक अनुभवी कलाकारांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. 


सम्बन्धित सामग्री