Bhooth Bangla Teaser: ‘भूत बंगला’ टीझर आऊट; दहशत आणि कॉमेडीचा राडा, अक्षय-प्रियदर्शनची जादू 16 वर्षांनंतर पुन्हा चालणार?

चित्रपटात 'वधुसुर' नावाच्या भुताची एन्ट्री झाली आहे. हे भूत नवरी मुलींचे अपहरण करते, त्यामुळे तिथे कोणीही लग्न करायला धजावत नाही. या दहशतीसोबतच अक्षय कुमारच्या कॉमेडीचा मसाला आहे.

Bhooth Bangla Teaser: ‘भूत बंगला’ टीझर आऊट; दहशत आणि कॉमेडीचा राडा, अक्षय-प्रियदर्शनची जादू 16 वर्षांनंतर पुन्हा चालणार?

Bhooth Bangla Teaser : बॉलीवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार आणि दिग्गज दिग्दर्शक प्रियदर्शन ही सुपरहिट जोडी तब्बल 16 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्यांच्या ‘भूत बंगला’ या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित टीझर आज प्रदर्शित झाला असून, यामध्ये हॉरर आणि कॉमेडीचा जबरदस्त तडका पाहायला मिळत आहे. यापूर्वी ‘हेरा फेरी’, ‘भूल भुलैया’ आणि ‘दे दना दन’ सारखे चित्रपट देणारी ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाली आहे.

मंजुलिकानंतर आता ‘वधुसुर’चा थरार
प्रियदर्शन यांच्या ‘भूल भुलैया’ (2007) मध्ये जशी मंजुलिकाची दहशत होती, तशीच काहीशी सुरुवात ‘भूत बंगला’च्या टीझरमध्ये दिसते. मात्र, यावेळी चित्रपटात ‘वधुसुर’ नावाच्या भुताची एन्ट्री झाली आहे. टीझरमध्ये मंगलपूर नावाच्या एका गावाचा उल्लेख आहे, जिथे हे भूत नवरी मुलींचे अपहरण करते, त्यामुळे तिथे कोणीही लग्न करायला धजावत नाही. ही भीतीदायक पार्श्वभूमी असली तरी, अक्षय कुमारच्या एन्ट्रीने टीझरमध्ये पुन्हा एकदा कॉमेडीचा रंग भरला जातो.

हेही वाचा – Siddharth Chandekar Fraud Call : सिद्धार्थ चांदेकरला फ्रॉड कॉल! भामट्याला म्हणायला लावली मराठी कविता; पाहा मजेशीर व्हिडिओ

अक्षय, परेश रावल आणि राजपाल यादवची ‘ती’ ऐतिहासिक तिगडी
चित्रपटाचे मुख्य आकर्षण म्हणजे अक्षय कुमार, परेश रावल आणि राजपाल यादव ही आयकॉनिक तिगडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. टीझरमध्ये अक्षय त्याच्या जुन्या विनोदी अंदाजात परतलेला दिसतोय, तर परेश रावल घाबरलेल्या अवस्थेत आणि राजपाल यादवसोबत होणारी फजिती पाहून हसू अनावर होते. यासोबतच तब्बू आणि वामिका गब्बी यांच्या लूकची झलकही पाहायला मिळते. विशेष म्हणजे, या टीझरमध्ये ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचीही महत्त्वाची भूमिका अधोरेखित करण्यात आली आहे.

तगडी स्टारकास्ट आणि प्रदर्शनाची तारीख
‘भूत बंगला’ मध्ये जिशु सेनगुप्ता, मनोज जोशी, राजेश शर्मा आणि मिथिला पालकर यांसारख्या कलाकारांच्या फौजफाटा आहे. एकता कपूरने या चित्रपटाची निर्मिती केली असून, हा चित्रपट 10 एप्रिल 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची स्पर्धा आदित्य धरच्या ‘धुरंधर 2’ सोबत असणार आहे, जो याच्या एक महिना आधी प्रदर्शित होईल. मात्र, अक्षय आणि प्रियदर्शन यांच्या जुन्या फॅन बेसमुळे या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करण्याची आशा आहे.

हेही वाचा – बालकलाकार म्हणून लोकप्रिय ठरलेल्या ‘या’ अभिनेत्रीचा घटस्फोट; लग्नाच्या चार वर्षांनतर झाली पतीपासून वेगळी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number