Miss Universe 2025: मिस युनिव्हर्स स्पर्धेत मोठी दुर्घटना; मिस जमैका स्टेजवरून पडली, रुग्णालयात उपचार सुरू

मिस जमैका गॅब्रिएल हेन्री इव्हिनिंग गाऊन सेगमेंटदरम्यान स्टेजवर चालत असताना अचानक तोल जाऊन जोरात पडल्या.

Miss Universe 2025: मिस युनिव्हर्स स्पर्धेत मोठी दुर्घटना; मिस जमैका स्टेजवरून पडली, रुग्णालयात उपचार सुरू

Miss Universe 2025: थायलंडमध्ये सुरू असलेल्या मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेत हादरवून टाकणारी घटना घडली आहे. आधीच तीन न्यायाधीशांच्या राजीनाम्यामुळे स्पर्धा वादात सापडलेली असताना आता मंचावरच मोठी दुर्घटना समोर आली आहे. मिस जमैका गॅब्रिएल हेन्री इव्हिनिंग गाऊन सेगमेंटदरम्यान स्टेजवर चालत असताना अचानक तोल जाऊन जोरात पडल्या. पडताना त्यांचे डोक्याला जबर धक्का बसल्याने उपस्थितांमध्ये काही क्षणांसाठी गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. या दुर्घटनेनंतर मिस जमैका यांना तातडीने स्ट्रेचरवरून रुग्णालयात हलवण्यात आले. सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ जलद गतीने व्हायरल होत असून नेटकऱ्यांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.

मिस युनिव्हर्स जमैका ऑर्गनायझेशनने 19 नोव्हेंबर रोजी इंस्टाग्रामवर दिलेल्या माहितीनुसार, हेन्री यांना जवळच्या पाओलो रंगसिट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या अपडेटनुसार, त्यांना कोणतीही गंभीर किंवा जीवघेणी दुखापत झालेली नाही. तथापि, त्यांना पूर्णपणे फिट घोषित करण्यापूर्वी आणखी काही चाचण्या कराव्या लागणार आहेत, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – Sonam Kapoor Pregnant: सोनम कपूर पुन्हा आई होणार! खास फोटो शेअर करत स्टायलिश पद्धतीने अभिनेत्रीकडून दुसऱ्या प्रेग्नन्सीची घोषणा

मिस युनिव्हर्स जमैका ऑर्गनायझेशनची प्रतिक्रिया

स्वतःच्या अधिकृत हँडलवर संस्थेने एक नोट शेअर करत लिहिले, ‘गॅब्रिएल हेन्री इव्हिनिंग गाऊन राउंडदरम्यान स्टेजवरून पडल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना जीवघेणी दुखापत नाही. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि सकारात्मक ऊर्जा पाठवा.’ संस्थेने चाहत्यांचे, समर्थकांचे आणि जागतिक स्पर्धकांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

हेही वाचा – Akshay Kumar : ती बुडत होती… तिला वाचवायला अक्षय कुमारने स्वतःचा जीव धोक्यात घातला, कोण आहे ती?

न्यायाधीशांच्या राजीनाम्यामुळे वाद

यापूर्वीच मिस युनिव्हर्स 2025 मध्ये तीन न्यायाधीशांच्या राजीनाम्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यात आता स्टेजवरील या दुर्घटनेने स्पर्धेचे वातावरण अधिक तणावग्रस्त झाले आहे. पुढील काही तासांत मिस जमैकाच्या अंतिम सहभागाबाबत महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number