बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाला अटक; राहत्या घरातून घेतलं ताब्यात, कारण धक्कादायक!

Actor Dino Morea Arrested : बॉलिवूडमधून एक अतिशय महत्त्वाची आणि हादरवणारी बातमी समोर आलेली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाला अटक करण्यात आलेली आहे. नेमके हे प्रकरण काय त्याबाबत सविस्तर जाणून घ्या.
Actor Dino Morea Arrested
अभिनेता दिनो मोरियाला अटक

बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्याला आज सकाळी त्याच्या राहत्या घरातूनच अटक केलीय. खरं तर मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आलेली आहे.

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
मिळालेल्या माहितीनुसार, आज 2 ऑक्टोबर रोजी सकाळपासूनच FOW कडून दिनो मोरियाची चौकशी सुरु होती. तब्बल 8 तास केलेल्या कसून चौकशीनंतर अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढीस तपासासाठी पोलीस आयुक्तालयात नेण्यात आलेले आहे. यापू्र्वीही या प्रकरणामध्ये ईडीनेही त्याला चौकशी केली होती आणि त्याच्या घरावर छापा टाकलेला होता.

हेही वाचा-परदेशात बॉलिवूड अभिनेत्रीचा भयानक अपघात; चाहत्यांची चिंता वाढली

नेमका काय आहे मिठी नदी घोटाळा?
मुंबई महापालिकेच्या मिठी नदी सफाईच्या कामात तब्बल पाहिलं तर 65 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. गाळ काढण्यासाठी लागणारी यंत्र तसेच उपकरणे भाड्याने घेताना मोठी आर्थिक अनियमितता झाल्याचे उघड झाले होते.

आरोपानुसार, कोची येथील मॅटप्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस या कंपनीकडून घेतलेल्या काही मशिनरीसाठी मुंबई महापालिकेकडून जास्त पैसेही वसूल करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात बीएससीच्या स्टॉर्म वॉटर ड्रेनेज विभागाते अधिकारी तसेच कंत्राटदार यांची मिलीभगत असल्याचा संशय आहे.

आता या प्रकरणी EWO ते 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला असून टेंडक प्रक्रियेत फेरफार करत ठराविक कंपन्यांना फायदा पोहोचवण्यात आलेल्याचा आरोप आहे. या दरम्यान, दिनो मोरियाचे नाव यापूर्वी दिशा सालियान प्रकरणातही चर्चेत आले होते. मॉडेलिंगपासून करिअक सूरु करणारा दिनो हा राज सिनेमातून रातोरात स्टार झआला होता. गेल्या अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर तो ए एम्पायर आता नुकताच हाऊसफुल 5 मध्ये दिसला होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version