Dadasaheb Phalke Award 2024: मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना 2024 चा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित मानला जाणारा 'दादासाहेब फाळके पुरस्कार 2024' दिग्गज कन्नड अभिनेते आणि राजकारणी अनंत नाग यांना प्रदान केला जाणार आहे.

Dadasaheb Phalke Award 2024: मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना 2024 चा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

Dadasaheb Phalke Award 2024:  भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित मानला जाणारा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार 2024’ दिग्गज कन्नड अभिनेते आणि राजकारणी अनंत नाग यांना प्रदान केला जाणार आहे. भारत सरकारने 16 सप्टेंबर रोजी या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. अनंत नाग यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेले अतुलनीय योगदान आणि त्यांचा गौरवशाली प्रवास लक्षात घेऊन ‘दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समिती’च्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा प्रवास येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना प्रशासनाने व्यक्त केली आहे.

72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात होणार गौरव

‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’ने (PIB) दिलेल्या माहितीनुसार, अनंत नाग यांना 22 सप्टेंबर 2026 रोजी केवडिया, गुजरात येथे आयोजित केल्या जाणाऱ्या 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात या सर्वोच्च सन्मानाने गौरवले जाईल. पीआयबी इंडियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कला क्षेत्रातील त्यांच्या अष्टपैलू कामगिरीची दखल घेत भारत सरकारला हा पुरस्कार देताना अत्यंत आनंद होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अनंत नाग यांचे विशेष अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे अनंत नाग यांचे अभिनंदन करत त्यांच्या अभिनय प्रवासाचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “ज्येष्ठ कलाकार अनंत नाग जी यांचे दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. अनेक दशकांपासून त्यांनी आपल्या सहज अभिनयाने, अष्टपैलूत्वाने आणि उत्कृष्ट कामगिरीने भारतीय चित्रपटसृष्टीवर, विशेषतः कन्नड सिनेमावर एक अनोखा ठसा उमटवला आहे. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका अत्यंत जिवंत आणि सखोल होती. एका असाधारण कलाकारासाठी हा खरोखरच योग्य सन्मान आहे.”

हेही वाचा – Sayaji Shinde: लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले सयाजी शिंदे; हिंदी भाषा सक्तीवर परखड भाष्य, म्हणाले…

300 हून अधिक चित्रपट आणि अष्टपैलू कारकीर्द

4 सप्टेंबर 1948 रोजी जन्मलेल्या अनंत नाग यांनी आपल्या कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मुख्यतः कन्नड चित्रपटसृष्टीतील कामासाठी ओळखल्या जाणाऱ्या अनंत नाग यांनी हिंदी, मल्याळम, तेलगू, मराठी आणि तमिळ भाषेतील चित्रपटांमध्येही आपला दमदार अभिनय दाखवला आहे. त्यांच्या कारकिर्दीत मुंगारू माळे, गौरी गणेश, मंथन, के.जी.एफ: चॅप्टर 1 व 2 यांसारख्या अनेक गाजलेल्या आणि लोकप्रिय चित्रपटांचा समावेश आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number