Tanvi Kolte: बिग बॉस फेम तन्वी कोलतेला बसला डिजिटल फटका; लाखो फॉलोअर्स असलेले इन्स्टाग्राम अकाऊंट गायब

तन्वी सध्या बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सक्रिय असतानाच, तिचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट अचानकपणे प्लॅटफॉर्मवरून दिसेनासे झाले आहे.

Tanvi Kolte: बिग बॉस फेम तन्वी कोलतेला बसला डिजिटल फटका; लाखो फॉलोअर्स असलेले इन्स्टाग्राम अकाऊंट गायब

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी 6' च्या घरात आपल्या खेळाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री तन्वी कोलते हिला बाहेर एक मोठा तांत्रिक धक्का बसला आहे. तन्वी सध्या बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सक्रिय असतानाच, तिचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट अचानकपणे प्लॅटफॉर्मवरून दिसेनासे झाले आहे. या प्रकारामुळे तिचे चाहते आणि सोशल मीडिया टीममध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?
बिग बॉससारख्या मोठ्या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धकाची लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी आणि चाहत्यांकडून मते (Voting) मागवण्यासाठी इन्स्टाग्राम हे सर्वात प्रभावी माध्यम मानले जाते. तन्वीच्या टीमकडून या अकाऊंटवरून तिचे फोटो, व्हिडिओ आणि व्होटिंग अपील्स शेअर केले जात होते. मात्र, अचानक हे अकाऊंट 'नॉट फाऊंड' दाखवत असल्याने चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

चाहत्यांच्या मनात शंकेची पाल 
तन्वीचे अकाऊंट एखाद्या सायबर हल्लेखोराने हॅक तर केले नाही ना? अशी शंका अनेक चाहत्यांनी उपस्थित केली आहे. इन्स्टाग्रामच्या काही तांत्रिक नियमांमुळे किंवा 'रिपोर्ट्स'मुळे अकाऊंट तात्पुरते सस्पेंड झाले असावे, असाही एक अंदाज वर्तवण्यात येत आहे. शोच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर सोशल मीडिया हँडल बंद झाल्यामुळे तन्वीच्या वोटिंगवर आणि 'इमेज बिल्डिंग'वर त्याचा नकारात्मक परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – PM Modi Letter For Vijay and Rashmika : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाला दिल्या खास शुभेच्छा, पत्र लिहित म्हणाले, 'लग्न समारंभाचे आमंत्रण मिळाल्याने…'

टीमची भूमिका अद्याप अस्पष्ट
तन्वी स्वतः घरामध्ये असल्याने तिला या घडामोडींची पुसटशीही कल्पना नाही. दरम्यान, तिच्या सोशल मीडिया टीमकडून किंवा कुटुंबियांकडून या तांत्रिक समस्येबाबत अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. इन्स्टाग्राम गायब झाल्याने तन्वीचा चाहत्यांशी असलेला थेट संपर्क तुटला आहे. आता तिचे अकाऊंट पुन्हा रिकव्हर होणार की तिला या डिजिटल फटक्याचा फटका निकालात सहन करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number