11 जानेवारीपासून सुरु झालेला बिग बॉस सीझन 6 आता अंतिम टप्प्यात आला आहे. बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत एकूण 6 सदस्य आहेत. यामध्ये तन्वी, अनुश्री, राकेश, दिपाली, रेवा आणि विशाल यांचा समावेश आहे. बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनच्या ग्रँड फिनालेसाठी अवघे काही दिवसच उरले आहेत. बिग बॉस मराठी सीझन 6 चा ग्रँड फिनाले 19 एप्रिलला पार पडणार आहे. त्यापुर्वी घरातील सदस्यांमध्ये या सीझनच्या टॉप 5 फायनलिस्टसाठी चढाओढ पाहायला मिळत आहे.
अशातच आज बिग बॉस मराठी सीझन 6 च्या शेवटच्या आठवड्याचे एलिमेनेशन झाले आहे. यावेळी आज रात्रीच्या वेळी गार्डन एरियामध्ये इंद्रधनुष्यातील सप्तरंगांच्या चौकोनांमध्ये एक गेम खेळला गेला. इंद्रधनुष्यातील सप्तरंगांच्या चौकोनांमध्ये गोल्डन की ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक स्पर्धकाला आपल्या रांगेतील किल्ली उचलून त्यासोबत असलेला संदेश वाचायचा होता. या खेळादरम्यान राकेश बापट हा दुसरा फायनलिस्ट तर अनुश्री माने ही तिसरी फायनलिस्ट ठरली आहे.
तर चोथा फायनलिस्ट विशाल कोटीयाल ठरला. यावेळी दिपाली सेफ झाली मात्र दुर्दैवाने रेवा कौरसेचा बिग बॉस सीझन 6 मधला प्रवास संपला आहे. रेवा कौरसे बाहेर झाल्याची घोषणा होताच, घराचं वातावरण एका क्षणात बदलून गेलं. रेवा कौरसेच्या एक्झिटनंतर अनुश्री माने, विशाल कोटीयन, राकेश बापट, तन्वी कोलते आणि दिपाली सय्यद हे या सीझनचे टॉप 5 फायनलिस्ट ठरले आहेत. दरम्यान या 5 फायनलिस्ट पैकी 'बिग बॉस मराठी 6' चा मानाचा तुरा कोण पटकावणार हे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.