बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री नुसरत भरुचा हिच्यासंबंधित एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. इंडोनेशियातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ बाली येथे तिचा भयानक अपघात झालेला आहे.
अपघात झाला कसा?
मिळालेल्या माहितीनुसार, नुसरत भरूचा ही तिथं एका नव्या प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी गेली होती,त्याचवेळी सेटवर ही संपूर्ण दुर्घटना घडली. अपघातानंतर तिला तातडीने बालीतील स्थानिक रुग्णालायामध्ये दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहे, अशी माहिती सध्या समोर येत आहे.
हेही वाचा-‘केबीसी 18’ च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात? पाय घसरून पडल्याने गुडघ्याला दुखापत
मात्र, हा अपघात नेमका कसा घडला आणि तिला किती दुखापत झालेली आहे, याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अभिनेत्री नुसरतच्या टीमनेही यावर सध्या कोणताही माहिती दिलेली नाही. नुसरतने सुद्धा सोशल मीडियावर याबाबतच कोणतीही पोस्ट केली नाही. त्यामुळे चाहत्यांची चिंता आणखी वाढलेली आहे.
सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रार्थना
सध्या सोशल मीडियावर #GetWellSoonNusrat हा हॅशटॅग ट्रेंड व्हायरल होत असून असंख्य चाहते तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. वैद्यकीय सल्ल्यानुसार अभिनेत्रीला अजून काही दिवस बालीमध्येच विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळेच तिचा भारतात येण्याचे नियोजन पुढे ढकलण्यात आलेले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.