बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर हनी सिंगचे सध्या कॉन्सर्ट सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी त्याचा मुंबईमध्ये कॉन्सर्ट पार पडला मात्र तो नियमांचे उल्लंघन केल्याने वादात सापडला. आता पुणे येथे हनी सिंगच्या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र आता पुन्हा वाद उफाळला आहे. शहरातील महालक्ष्मी लॉन्स येथे होणाऱ्या या कार्यक्रमासंदर्भात चंदीगड येथील एका व्यक्तीने थेट पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवून गंभीर आक्षेप नोंदवला आहे.
संबंधित व्यक्तीने आपल्या पत्रात हनी सिंगच्या 'चार बॉटल व्होडका' आणि 'मिलियनयर' या गाण्यांवर आक्षेप घेतला आहे. या गाण्यांमधून तंबाखूजन्य पदार्थांचा प्रचार आणि अप्रत्यक्ष प्रसार होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
हेही वाचा – PF Withdrawal Online: PF काढणं झालं अगदी सोपं! या सरकारी App वरून करा ऑनलाईन क्लेम आणि बॅलेन्स तपासा
त्याचप्रमाणे या कार्यक्रमात 18 वर्षांखालील तरुणांनाही प्रवेश दिला जात असल्याने अशा गाण्यांचा त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही गाण्यांचे सादरीकरण कार्यक्रमात रोखण्यात यावे, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, चंदीगड येथील एका व्यक्तीने थेट पुणे पोलीस आयुक्त यांना एक पत्र लिहीत यो यो हनी सिंग यांच्या पुण्यात येत्या चार तारखेला होणाऱ्या कार्यक्रमास संदर्भात एक पत्र लिहलं आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या यो यो हनी सिंग चा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या कार्यक्रमादरम्यान परवानगी नसताना सुद्धा लेझर लाईट लावण्यात आल्यामुळे या कार्यक्रमावर अनेकांनी आक्षेप घेतला होता