Tuesday, November 11, 2025 05:01:50 AM

The Bengal Files : ट्रेलर प्रदर्शनापासूनच वादात राहिलेल्या The Bengal Files नं तीन दिवसांत जमवला कोट्यवधीचा गल्ला; चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरू

विवेक अग्निहोत्रींचा 'द बंगाल फाइल्स' या चित्रपटाची प्रदर्शित होण्याआधीपासूनच जोरदार चर्चा होती. या चित्रपटाने सोबतच प्रदर्शित झालेल्या बागी 4, द कॉन्ज्युरिंग: लास्ट राइट्स यांना चांगली टक्कर दिली.

the bengal files  ट्रेलर प्रदर्शनापासूनच वादात राहिलेल्या the bengal files नं तीन दिवसांत जमवला कोट्यवधीचा गल्ला चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरू

The Bengal Files 3 Days Box Office Collection : विवेक अग्निहोत्रींचा 'द बंगाल फाइल्स' या शुक्रवारी (5 सप्टेंबर) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीपासूनच चर्चेचा विषय बनला आहे. बॉक्स ऑफिसवर वाद आणि जोरदार स्पर्धा असूनही, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी चांगली कमाई केली. ट्रेड वेबसाइट सॅकनिल्कनुसार, शनिवारी चित्रपटाने भारतात 2.15 कोटी रुपये कमावले. शनिवारी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांची संख्या 29.91 टक्के होती. सकाळच्या शोमध्ये चित्रपटाची प्रेक्षकसंख्या 15.11 टक्के, दुपारी 29.20 टक्के, संध्याकाळी 35.08 टक्के आणि रात्रीच्या शोमध्ये 40.23 टक्के होती.

'द बंगाल फाइल्स' ला 'बागी 4' या अॅक्शन चित्रपट आणि हॉलिवूड हॉरर चित्रपट 'द कॉन्ज्युरिंग: लास्ट राइट्स' कडून कडक स्पर्धा मिळाली. पहिल्या दिवशी चित्रपटाने 1.75 कोटी रुपये कमावले. ही कमाई अग्निहोत्री यांचा याआदीचा चित्रपट 'द काश्मीर फाइल्स' च्या तुलनेत अगदीच कमी सुरुवात होती. द काश्मीर फाइल्सने 2022 मध्ये पहिल्या दिवशी 3.55 कोटी रुपये कमवले होते. दुसऱ्या दिवशी बंगाल फाइल्सने स्थिती सुधारत 2.15 कोटी रुपये कमवले आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी 7 सप्टेंबर रोजी चित्रपट 2.75 कोटी रुपये कमवले आहेत. यासह, तीन दिवसांचे या चित्रपटाचे अंदाजे कलेक्शन 6.65 कोटी रुपये झाले आहे.

हेही वाचा - The Bengal Files Review: हिंदू नरसंहार…मुस्लिम लीगचे अत्याचार…बंगालमध्ये किंकाळ्या आणि रक्ताचा सडा! कसा आहे विवेक अग्निहोत्रींचा नवा चित्रपट?

हा नवीन चित्रपट विवेक अग्निहोत्री यांच्या 'फाईल्स' त्रिकोणाचा भाग आहे आणि भारतीय इतिहासाच्या एका महत्त्वाच्या कठीण अध्यायात खोलवर उतरतो. ही कथा मानवी प्रतिष्ठेसाठी आणि जगण्याच्या मूलभूत अधिकारासाठीच्या सार्वत्रिक संघर्षावर प्रकाश टाकते. चित्रपटाच्या भावनिक आणि सशक्त कथेसह चित्रपट भूतकाळातील न सांगितलेल्या सत्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो.

द बंगाल फाइल्स हा चित्रपट विवेक रंजन अग्निहोत्री यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला आहे. तर, अभिषेक अग्रवाल, पल्लवी जोशी आणि विवेक रंजन अग्निहोत्री यांनी याची निर्मिती केली आहे. तेज नारायण अग्रवाल आणि आय. एम. बुद्धा प्रॉडक्शन्स यांनी सादर केलेला हा चित्रपट, द काश्मीर फाइल्स आणि द ताश्कंद फाइल्स या तीन चित्रपटांचा एक भाग आहे. जे याआधीच प्रदर्शित झाले आहेत.

हेही वाचा - Venice Film Festival Award: अनुपर्णा रॉय यांचा ऐतिहासिक पराक्रम! व्हेनिस चित्रपट महोत्सवात मिळाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार


सम्बन्धित सामग्री