नवी दिल्ली: जेव्हा मिस वर्ल्ड आणि बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय फ्रान्समधील कान्स शहरात पोहोचली, तेव्हा सर्वजण रेड कार्पेटवर त्यांच्या येण्याची वाट पाहत होते. गुरुवारी संध्याकाळी ऐश्वर्या राय रेड कार्पेटवर अगदी वेगळ्या शैलीत पोहोचली होती. पहिल्या दिवशी तिने साडी नेसून परदेशी भूमीवर भारतीय संस्कृतीचे सादरीकरण केले होते, तर दुसऱ्या दिवशी तिची शैली खूप वेगळी होती.
दुसऱ्या कान्स फिल्म फेस्टीवलसाठी ऐश्वर्या रायने एक गाऊन घातला होता, ज्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली. तिने रेड कार्पेटवर पाऊल ठेवताच सर्व कॅमेरे तिच्याकडे वळले. सगळे फक्त ऐश्वर्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते. तिचा पोशाख पाश्चात्य असला तरी तिने त्याला भारतीय रंग दिला. ऐश्वर्याच्या या खास लूकची चर्चा सर्वत्र होत आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
हेही वाचा: युट्यूबर ज्योती मल्होत्रा 3 वेळा दिली मुंबईला भेट; गर्दीच्या ठिकाणी ज्योतीचा वावर
कसा होता ऐश्वर्याचा खास लूक?
ऐश्वर्या राय बच्चनचा हा सुंदर पोशाख प्रसिद्ध डिझायनर गौरव गुप्ता यांनी डिझाइन केला होता. काळ्या रंगाच्या फिटिंग गाऊनमध्ये ऐश्वर्या खूप सुंदर दिसत होती. तिचा हा गाऊन हाताने भरतकाम करून अतिशय सुंदर पद्धतीने सजवलेला होता. भरतकाम व्यतिरिक्त त्यावर चांदी, सोने आणि चारकोलचे कामही करण्यात आले होते. गाऊनचे सौंदर्य वाढवण्यासाठी त्यावर मायक्रो ग्लास क्रिस्टल्सचा देखील वापर करण्यात आला होता.
हेही वाचा: वैष्णवी आणि मयुरीच्या कुटुंबीयांनी केला हगवणे कुटुंबाबद्दल मोठा खुलासा
केपचे वैशिष्ट्य:
तिने वेस्टर्न गाऊनसोबत चांदीचा रंगाचा केप घातला होता. बनारसी ब्रोकेड केप खूप सुंदर दिसत होता. या केपवर भगवद्गीतेतील संस्कृत श्लोक 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि' कोरलेला आहे. याचा अर्थ असा की, 'तुम्हाला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, फळांचा नाही. म्हणून, तुमच्या कर्मांच्या फळांसाठी कर्म करू नका आणि अकर्मात अडकू नका'.