Monday, June 23, 2025 11:41:26 AM

Celebrities Use These Perfumes: शाहरूख खान, रणवीर सिंह वापरतात या ब्रँडचे परफ्यूम

अभिनेत्यांच्या परफ्यूमचे ब्रँड्स खूप महाग असतात. चला तर जाणून घेऊया आपले आवडते सेलेब्रिटी कोणत्या ब्रँडचे परफ्यूम वापरतात.

celebrities use these perfumes शाहरूख खान रणवीर सिंह वापरतात या ब्रँडचे परफ्यूम

कार्यक्रमाला जाण्यासाठी आपण अनेकदा परफ्यूमचा वापर करतो. परफ्यूम लावल्यामुळे शरीरातून सुंगध दरवळू लागतो. त्याप्रमाणेच आपले आवडते सेलेब्रिटीसुद्धा महत्वाच्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी आपल्या आवडत्या ब्रँडचे परफ्यूम लावतात. त्यांच्या परफ्यूममधून येणाऱ्या सुगंधामुळे अनेकजण त्यांचे कौतुक करतात. एका कार्यक्रमात जेव्हा कॉमेडियन कपिल शर्मा अभिनेत्री इलियाना डी'क्रूज़ आणि ईशा गुप्ता यांना विचारतो की, 'तुम्ही कोणत्या ब्रँडचे परफ्यूम वापरला आहात?' तेव्हा इलियाना हसून उत्तर देते, 'शनेल' आणि ईशा 'गूची फ्लोरा' उत्तर देते. मात्र, अभिनेत्यांच्या परफ्यूमचे ब्रँड्स खूप महाग असतात. चला तर जाणून घेऊया आपले आवडते सेलेब्रिटी कोणत्या ब्रँडचे परफ्यूम वापरतात. 

1 - अभिनेता शाहरुख खान:

अभिनेता शाहरुख खान त्याच्या ब्रँडेड परफ्यूममुळे नेहमीच चर्चेत असतो. अभिनेत्री प्रीती झिंटा, माहिरा खान, आदी. अनेकजण त्यांच्या परफ्यूमचे कौतुक करत ते कोणत्या ब्रँड चे परफ्यूम वापरतात असे देखील विचारतात. एका मुलाखतीदरम्यान अभिनेता शाहरुख खान आपण नेमकं कोणत्या ब्रँडचे परफ्यूम लावतो याचा उलगडा करतात. शाहरुख खान 'Dunhill and Diptyque' ब्रँड्सचा परफ्यूम वापरतो. 

2 - अभिनेत्री दीपिका पादुकोण:

अभिनेत्री दीपिका पादुकोण तिच्या चित्रपटांमुळे आणि परफ्यूममुळे अनेकदा चर्चेत असते. चाहत्यांमध्ये आपली आवडती अभिनेत्री दीपिका पादुकोण नेमकं कोणत्या ब्रँडचे परफ्यूम लावते हा प्रश्न निर्माण होतो. एका कार्यक्रमांत अभिनेत्री दीपिका पादुकोण आपल्या आवडत्या परफ्यूमबद्दल सांगते. अभिनेत्री दीपिका पादुकोण 'For Her by Narciso Rodriguez' या ब्रँडचे परफ्यूम वापरते. दीपिकाप्रमाणेंच अभिनेत्री कतरिना कैफ, आणि अभिनेत्री परिणीती चोप्रादेखील याच ब्रँडचे परफ्यूम वापरतात. 

3 - अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास:

अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या दमदार अभिनयामुळे चाहते तिचे कौतुक करतात. सध्या अमेरिकन सिंगर निक जोनास सोबत 2018 मध्ये विवाह केला असून प्रियांका आणि निक यांची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनस सुद्धा नेहमी चर्चेत असते. एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्री प्रियांका चोप्रा आपल्या आवडत्या परफ्यूमबद्दल सांगते. अभिनेत्री प्रियांका चोप्रा 'Trussardi Donna' या ब्रँडचे परफ्यूम वापरते. 

4 - अभिनेता रणवीर सिंघ: 

अभिनेता रणवीर सिंघ त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या अतरंगी कपड्यांमुळे सतत चर्चेत असतो. एका इव्हेंटदरम्यान रणवीर सिंघने आपल्या आवडत्या परफ्यूमबद्दल संगितले. अभिनेता रणवीर सिंघ 'Atkinsons Oud Save The Queen' या ब्रँडचा परफ्यूम वापरतो. 

5 - अभिनेत्री आलिया भट्ट:

अभिनेत्री आलिया भट्टने आपल्या उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांचे मन जिंकले. वयाच्या 18 व्या वर्षी तिने स्टुडन्ट ऑफ द इयर पासून अभिनय क्षेत्रात पदार्पण केली. मात्र जेव्हा आलिया भट्ट बॉलीवूडमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत होती, तेव्हा एका अभिनेत्याने एका मुलाखतीत खुलासा करत तिच्या आवडत्या परफ्यूमबद्दल सांगितला, "आलिया भट्ट 'Armani Code or Bleu De Chanel' या ब्रँडचा परफ्यूम वापरते". 


सम्बन्धित सामग्री