Dog Attack: प्रसिद्ध गायकाला कोर्टाचा झटका; पाळीव कुत्र्याने तोडले मोलकरणीचे लचके; आता द्यावी लागणार 124 कोटींची नुकसानभरपाई

मारियावर हल्ला करणारा 'हेड्स' (Hades) नावाचा कुत्रा तब्बल 90 किलो वजनाचा आणि अत्यंत आक्रमक 'कॉकेशियन शेफर्ड' जातीचा होता.

Dog Attack: प्रसिद्ध गायकाला कोर्टाचा झटका; पाळीव कुत्र्याने तोडले मोलकरणीचे लचके; आता द्यावी लागणार 124 कोटींची नुकसानभरपाई

Dog Attack: प्रसिद्ध अमेरिकन गायक आणि गीतकार ख्रिस ब्राउन याला एका जुन्या प्रकरणात न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. त्याच्या घरात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर पाळीव कुत्र्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी न्यायालयाने त्याला तब्बल 13 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 124 कोटी रुपये) नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. 'People' मासिकाने दिलेल्या वृत्तानुसार, हा अत्यंत हिंसक हल्ला 2020 मध्ये झाला होता. लॉस एंजेलिसमधील ज्युरीने ख्रिस ब्राउनची माजी घरकामगार मारिया अविला हिच्या बाजूने हा ऐतिहासिक निकाल दिला. मारियावर हल्ला करणारा 'हेड्स' (Hades) नावाचा कुत्रा तब्बल 90 किलो वजनाचा आणि अत्यंत आक्रमक 'कॉकेशियन शेफर्ड' जातीचा होता, जो ख्रिस ब्राउनने स्वतःच्या सुरक्षेसाठी ठेवला होता.

अंगाचे लचके तोडले; चेहरा आणि हात कायमचे विद्रूप
प्राप्त माहितीनुसार, दोन आठवडे चाललेल्या या प्रदीर्घ खटल्यानंतर न्यायालयाने निष्काळजीपणाचा ठपका ठेवत ख्रिस ब्राउन आणि त्याची कंपनी 'Black Pyramid LLC' यांना मारिया अविलाला 13 दशलक्ष डॉलर्स देण्याचे आदेश दिले. खटल्यादरम्यान मारियाने 2020 मधील त्या भयानक रात्रीची हकीकत सांगितली. कॅलिफोर्नियातील टार्झाना येथील ब्राउनच्या बंगल्यावर ती जेव्हा कचरा बाहेर टाकण्यासाठी गेली, तेव्हा या कुत्र्याने तिच्यावर झडप घातली. कुत्र्याने मारियाच्या शरीरावरील त्वचेचे मोठे लचके तोडल्यामुळे तिचा चेहरा आणि हात कायमचे विद्रूप झाले असून, तिला आता हालचाल करण्यातही प्रचंड त्रास होतो. याशिवाय, हल्ल्याच्या वेळी तिथेच काम करणाऱ्या मारियाच्या बहिणीला (पॅट्रिशिया) 8,85,000 डॉलर्स आणि मारियाच्या पतीला (ऑस्कर ऑलिव्हो) 50,000 डॉलर्स देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

'रक्त पाहून मी घाबरलो आणि पळून गेलो'; ख्रिस ब्राउनने दिली कबुली
'BBC' च्या वृत्तानुसार, खटल्याच्या सुनावणीदरम्यान ख्रिस ब्राउनने मान्य केले की तो मारियाला रक्ताच्या थारोळ्यात पाहून प्रचंड घाबरला होता. मात्र, व्यवस्थापकाच्या सल्ल्यानुसार त्याने तातडीने घटनास्थळावरून पळ काढला. त्याने स्वतः 911 वर कॉल केला असता किंवा पोलीस येईपर्यंत तो तिथे थांबला असता, तर या घटनेची मीडियात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली असती, अशी भीती त्याला वाटत होती. No One Else या सुपरहिट गाण्यासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या या गायकाने असाही दावा केला की, त्याने मारिया आणि तिच्या बहिणीला कुत्र्यांच्या जवळ न जाण्याचा इशारा दिला होता.  

हेही वाचा – Khashaba Teaser: मातीतील लढाई, अजय-अतुलचं संगीत… नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'चा जबरदस्त टीझर रिलीज; पाहा व्हिडीओ

भाषेचा अडथळा आणि सुरक्षेचे कारण
ख्रिस ब्राउनने दिलेल्या इशाऱ्याचा दावा त्या दोन्ही बहिणींनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. त्यांच्यात आणि गायकामध्ये भाषेचा मोठा अडथळा असल्यामुळे असा कोणताही संवाद किंवा ताकीद मिळणे शक्यच नव्हते, असे त्यांनी न्यायालयात सांगितले. दुसरीकडे, ख्रिस ब्राउनने आपल्या बचावात स्पष्ट केले की, त्याला वारंवार पाठलाग करणारे अज्ञात व्यक्ती आणि चाहत्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने त्याने एवढा मोठा आणि धोकादायक कुत्रा पाळला होता. मात्र, सुरक्षेच्या या अट्टहासापायी आता त्याला कोट्यवधी रुपयांचा दंड सोसावा लागणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number