Friday, December 05, 2025 01:54:47 AM

Dharmendra Health Update: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज; घरातच सुरू राहणार उपचार

गेल्या काही आठवड्यांपासून त्यांची तब्येत बिघडत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

dharmendra health update ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज घरातच सुरू राहणार उपचार

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांना बुधवारी सकाळी ब्रीच कॅंडी हॉस्पिटल (Breach Candy Hospital) मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. उपचार करणारे डॉक्टर डॉ. प्रतीत समदानी (Dr. Pratit Samdani) यांनी सांगितले की, कुटुंबाने धर्मेंद्र यांच्यावर घरातच उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ. समदानी म्हणाले, “धर्मेंद्रजींना आज सकाळी साडेसात वाजता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. आता त्यांच्यावर घरातच उपचार सुरू राहतील.” गेल्या काही आठवड्यांपासून धर्मेंद्र यांची तब्येत अधूनमधून बिघडत होती आणि ते रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या प्रकृतीविषयी चुकीच्या अफवा पसरवल्या गेल्याने कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. धर्मेंद्र यांच्या कन्या ईशा देओल (Esha Deol) आणि पत्नी हेमा मालिनी (Hema Malini) यांनी या बातम्यांना फेक असल्याचे सांगितले. ईशा म्हणाली, “पप्पा स्थिर आहेत आणि बरे होत आहेत. कृपया आमच्या कुटुंबाला थोडी प्रायव्हसी द्या. सर्वांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करावी.”

हेही वाचा: Cyber Crime In Akola : 'पाणी बिल भरा, अन्यथा पाईपलाईन तोडू'; असे सांगत सायबर गुन्हेगारांची बँकेतून लाखो रुपयांची लुट

दरम्यान, धर्मेंद्र यांचे पुत्र सनी देओल (Sunny Deol) यांच्या टीमनेही निवेदन जारी करून सांगितले की, “सर उपचारांना प्रतिसाद देत आहेत आणि बरे होत आहेत. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी.” या बातमीमुळे धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही वेळापूर्वी हेमा मालिनी आणि ईशा देओल रुग्णालयातून बाहेर पडल्या असून, सनी देओल आणि बॉबी देओल तिथे पोहोचले होते.

सोशल मीडियावर चाहत्यांनी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत सुटकेचा निश्वास टाकला. काहींनी खोट्या बातम्यांबद्दल नाराजी व्यक्त केली, तर काहींनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. एका चाहत्याने X वर लिहिले, “धर्मेंद्रजी लवकर बरे व्हा, आणि पुन्हा सिनेमात झळका.”

हेही वाचा: Delhi Blast Update : दिल्ली स्फोटप्रकरणात नवे धागेदोरे समोर; फॉरेन्सिक तपासात आढळले अमोनियम नायट्रेट आणि उच्च दर्जाचे विस्फोटक


सम्बन्धित सामग्री