Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणात मोठी घडामोड! "आदित्य ठाकरेंना आताच्या आता अटक करा" दिशाच्या वडिलांची CBIकडे मोठी मागणी  

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियान हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. दिशा सालियानच्या वडिलांनी CBI कडे आपला जबाब नोंदवला.

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणात मोठी घडामोड! &quotआदित्य ठाकरेंना आताच्या आता अटक करा&quot दिशाच्या वडिलांची CBIकडे मोठी मागणी  

दिशा सालियानच्या मृत्यूवरून महाराष्ट्राच्या राजकारणात आधीच मोठे वादळ उठले होते. या प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले असून भाजप नेते नितेश राणे यांनी सातत्याने ठाकरे गटावर निशाणा साधला होता. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियान हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी मुंबईतील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) कार्यालयात जाऊन आपला जबाब नोंदवला.

जबाब नोंदवताना त्यांनी शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांच्यासह अभिनेत्री रिया चक्रवर्ती, अभिनेता सूरज पांचोली, डिनो मोरिया आणि काही बॉडीगार्ड्स यांची नावं घेतली. जवळपास चार तासांनंतर सतिश सालियान सीबीआयच्या कार्यालयातून पडले बाहेर पडले. आपल्या मुलीसोबत जे घडलं, त्याबाबत आपण अधिकाऱ्यांना सर्व माहिती दिल्याचं त्यांनी सांगितलं. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी मांडलेले सर्व मुद्दे आणि घेतलेली नावं नोंदवून घेतली आहेत. अधिकाऱ्यांनी पुढील काही दिवसांत या प्रकरणातील कार्यवाही सुरू केली जाईल, असं सांगितल्याचा दावाही सतीश सालियान यांनी केला. तसेच “आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती यांना आताच्या आता अटक करा आणि जी शिक्षा असेल ती सुनवा,” अशी मागणी त्यांनी केली. 

हेही वाचा- Laxman Hake Attack : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला! म्हणाले, “हे सगळे जरांगेंचे कार्यकर्ते” सोलापुरात नेमकं काय घडलं?

यावेळी सतीश सालियान यांनी म्हटलं की, “जे फॅक्ट आहे, जे माझ्या मुलीसोबत घडलं, तेच सर्व मी अधिकाऱ्यांना सांगितलं. सत्याचा पराभव होऊ शकत नाही. जिथे सत्य असतं, तिथे देव असतो. त्यामुळे न्याय मिळेल. आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती यांना आताच्या आता अटक करा आणि जी शिक्षा असेल ती सुनवा.” अशी मागणी त्यांनी केली. 

उच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतर आता सीबीआयने या प्रकरणाची सूत्रे हातात घेतली आहेत.  मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवल्यानंतर राजकीय आणि कायदेशीर वर्तुळात वेगाने घडामोडी घडत आहेत. अशातच दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुलीच्या मृत्यूच्या तपासात गंभीर त्रुटी झाल्याचा आरोप केल्यामुळे आधीच राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील ठरलेल्या दिशा सालियान मृत्यू प्रकरणात येत्या दिवसांत कोणते नवे खुलासे होतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number