Pawan Singh Threat: ‘सलमान खानसोबत स्टेज शेअर करू नकोस…’; भोजपुरी स्टार पवन सिंगला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकी

लखनऊमध्ये असताना त्यांना एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला आणि स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने त्यांना गंभीर इशारा दिला.

Pawan Singh Threat: ‘सलमान खानसोबत स्टेज शेअर करू नकोस…’; भोजपुरी स्टार पवन सिंगला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकी

Pawan Singh Threat: भोजपुरी सुपरस्टार आणि ‘पॉवर स्टार’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता पवन सिंगला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लखनऊमध्ये असताना त्यांना एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला आणि स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने त्यांना गंभीर इशारा दिला. धमकीत पवन सिंगला स्पष्ट सांगण्यात आले की, त्याने सलमान खानसोबत स्टेज शेअर करू नये, अन्यथा त्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. 

बिग बॉसच्या ग्रँड फिनालेसाठी तयारी चालू असताना धमकीचा फोन

पवन सिंग येत्या 7 डिसेंबर रोजी ‘बिग बॉस’च्या अंतिम फेरीत (फिल्म सिटी, गोरेगाव) सादरीकरण करणार होता. त्याच कार्यक्रमात सलमान खान होस्ट म्हणून उपस्थित राहणार असल्याने, स्टेज शेअर करण्यास मज्जाव करणारी ही धमकी अधिक चिंताजनक ठरली आहे. सूत्रांच्या मते, धमकी देणाऱ्या व्यक्तीने सलमान खानचे नाव घेत म्हटलं की, 'जर तू सलमान खानसोबत स्टेजवर दिसलास, तर पुन्हा कधी काम करू शकणार नाहीस.' 

हेही वाचा – Bigg Boss 19: ‘बिग बॉस 19’ फिनालेपूर्वी बदलला टाइम स्लॉट! आता कुठे आणि कधी पाहता येणार? इथे आहे संपूर्ण माहिती

धमकीसोबत खंडणीची मागणीही

प्राथमिक माहितीनुसार, कॉल करणाऱ्याने मोठ्या रकमेची मागणी केली आणि नकार दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी थेट धमकीही दिली. पवन सिंग लखनऊमध्ये असून, फोन आल्यानंतर त्यांच्या टीमने त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – Dhurandhar Box Office Colletion : रणवीर सिंहच्या 'धुरंधर'ची छप्परफाड कमाई , अवघ्या दोन दिवसांत कमवाले…

पोलिस तपास सुरू  

या प्रकरणाची औपचारिक तक्रार दाखल करण्याची तयारी पवन सिंगच्या टीमने सुरू केली आहे. तथापी, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. धमकीचा कॉल करणारा खरोखर लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित आहे का? धमकी कुठून दिली गेली? मागणी केलेली रक्कम काय होती? याचा शोध पोलीस करतील. पवन सिंग हा भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणाकडे मनोरंजन, पोलीस विभाग आणि चाहत्यांचेही लक्ष वेधले गेले आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number