‘दृश्यम दि कनक्लुजन’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास; पहिल्याच दिवशी केली विक्रमी कमाई

या दमदार कमाईसह ‘दृश्यम 3’ने केवळ रेकॉर्डच मोडले नाहीत, तर बॉलिवूडच्या 5 सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या दिवशीच्या चित्रपटांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

‘दृश्यम दि कनक्लुजन’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास; पहिल्याच दिवशी केली विक्रमी कमाई
Drishyam

Drishyam 3 Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘दृश्यम द कनक्लुजन’ किंवा ‘दृश्यम 3’ रिलीज होण्याआधीपासूनच प्रचंड चर्चेत होता. एक लोकप्रिय आणि ब्लॉकबस्टर फ्रँचायझीचा शेवटचा भाग असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दल अभूतपूर्व उत्सुकता पाहायला मिळाली. या प्रचंड हाइपमुळे चित्रपटाची अत्यंत जोरदार ऍडव्हान्स बुकिंग झाली होती आणि अपेक्षेप्रमाणे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान ओपनिंग करत अनेक नवे विक्रम स्वतःच्या नावावर केले आहेत. तसेच या मोठ्या चित्रपटामुळे इतर काही चित्रपटांचे प्रदर्शनदेखील लांबणीवर ढकलण्यात आले आहे.

चित्रपटाची धमाकेदार ओपनिंग आणि प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद
‘दृश्यम 3’ हा बहुचर्चित चित्रपट 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या औचित्याने चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले असून, चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांनी गर्दी करत याला डोक्यावर घेतले आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चित्रपटाला अगदी सकारात्मक प्रतिक्रिया मिळत असून, डायलॉग्सपासून क्लायमॅक्सपर्यंत सर्वच गोष्टींचे कौतुक होत आहे. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी तब्बल 66.75 कोटी रुपयांची दणदणीत कमाई केली आहे.

अजय देवगणच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट
या दमदार कमाईसह ‘दृश्यम 3’ने केवळ रेकॉर्डच मोडले नाहीत, तर बॉलिवूडच्या 5 सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या दिवशीच्या चित्रपटांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. हा चित्रपट अभिनेता अजय देवगणच्या कारकिर्दीतील आजवरचा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे. याने शाहरुख खान, रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांसारख्या स्टार्सच्या चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे विक्रम मागे टाकले आहेत.

हेही वाचा – बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाला मोठा दिलासा; प्रकरणात नवा ट्विस्ट

भारतातील सुरुवातीपासून टॉप कमाई करणारे चित्रपट

– धुरंधर 2 – 145 कोटी

– आदिपुरुष – 86.75 कोटी

– जवान – 75 कोटी

– दृश्यम 3 – 66.75 कोटी

– स्त्री 2 – 64.8 कोटी

– ॲनिमल – 63.8 कोटी

– पठाण – 57 कोटी

– वॉर – 53.35 कोटी

– वॉर 2 – 52.5 कोटी

– ठग्स ऑफ हिंदोस्तान – 52.25 कोटी

चित्रपटाची हीच अफाट क्रेझ पाहता, बॉक्स ऑफिसवरील स्पर्धा टाळण्यासाठी आयुष्मान खुरानाचा ‘टली उडता तीर’ या आगामी चित्रपटाचे प्रदर्शन देखील लांबणीवर ढकलण्यात आले आहे.

हेही वाचा – ‘केबीसी 18’ च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात? पाय घसरून पडल्याने गुडघ्याला दुखापत

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number