मुंबई: फराह खान केवळ एक कोरियोग्राफर नाहीच, तर ती एक दिग्दर्शिका आणि सध्या यूट्यूबर आहे. फराह सतत तिच्या यूट्यूब चॅनेलवर नवीनवीन व्हिडिओ अपलोड करत असते. फराह तिच्या अप्रतिम कंटेटमुळे नेहमी चर्चेत असते. नुकताच, फराह खानने तिच्या यूट्यूब चॅनेलवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत फराह खान शेफ दिलीपसोबत अभिनेता चंकी पांडेच्या घरी आली आहे. विशेष म्हणजे, शेफ दिलीपने अभिनेता चंकी पांडेच्या हाऊसफुल्ल फ्रँचायझीमधील लोकप्रिय पात्र 'आखरी पास्ता' लूक केला. दिलीपचा लूक पाहून चाहते थक्क झाले.
हेही वाचा: Kantara Chapter 1 Trailer: प्रतीक्षा संपली! 'कांतारा चॅप्टर 1' चा ट्रेलर 'या' दिवशी रिलीज होणार
दिलीप बनला 'पहिला पास्ता'
फराहचा पती शिरीष कुंदरकडून घेतलेला विग, बनावट मिशा आणि मोठी टोपी घालून, दिलीपने स्वत:ची ओळख 'पहिला पास्ता' अशी ओळख करून दिली. चंकीच्या भूमिकेशी प्रामाणिक राहून, दिलीपने फराहच्या व्हिडिओत चंकीचा लोकप्रिय डायलॉग 'मम्मा मिया' आणि 'आयएमअ जोकिंग' म्हणला. यादरम्यान, फराह हसत म्हणाली की, 'मला कळत नाही की हे मनोरंजक आहे की भयानक?'. या हास्यविनेदी संवादामुळे सर्वत्र हास्याची लाट उसळली.
दिलीपच्या पगाराबाबत फराह खानने केला विनोद
फराह म्हणाली, 'दिलीपला त्याचा पगार दरमहिन्याला 1 लाख केला जात आहे, असं सांगितल्यानंतर विनोद सुरूच राहिला. यादरम्यान, शेफ दिलीपचे डोळे चमकले. मात्र, फराहदेखील चंकी पांडेचा लोकप्रिय डायलॉग वापरून, 'आयएमअ जोकिंग', अशी हास्यास्पद प्रतिक्रिया दिली. त्यामुळे, सर्वजण हसू लागले. यादरम्यान, चंकी पांडेने दिलीपला जास्त पगार, कार आणि घर देण्याचे आश्वासन देण्याचा नाटक केला, मात्र फराहशी असलेल्या त्याच्या निष्टेवर दिलीप ठाम राहिला.