Filmfare OTT Awards: फिल्मफेअर OTT अवॉर्ड्स जाहीर; कोण ठरलं पुरस्कारचं मानकरी, पहा संपूर्ण विजेत्यांची यादी

वेब सिरीज, वेब फिल्म्स, अभिनय, दिग्दर्शन आणि तांत्रिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना प्रतिष्ठित ब्लॅक लेडी ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले.

Filmfare OTT Awards: फिल्मफेअर OTT अवॉर्ड्स जाहीर; कोण ठरलं पुरस्कारचं मानकरी, पहा संपूर्ण विजेत्यांची यादी

Filmfare OTT Awards: मुंबईत 15 डिसेंबर रोजी पार पडलेल्या फिल्मफेअर OTT अवॉर्ड्स 2025 च्या सहाव्या पर्वाने डिजिटल विश्वातील सर्वोत्तम कामगिरीचा गौरव केला. या दिमाखदार सोहळ्याला आलिया भट्ट, विकी कौशलसह अनेक नामवंत कलाकारांची उपस्थिती लाभली. वेब सिरीज, वेब फिल्म्स, अभिनय, दिग्दर्शन आणि तांत्रिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना प्रतिष्ठित ब्लॅक लेडी ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले. या वर्षी पुरस्कारांवर ‘पाताळ लोक सीझन 2’, ‘ब्लॅक वॉरंट’ आणि ‘खौफ’ या वेब सिरीजनी आपली छाप पाडली. तर वेब ओरिजिनल फिल्म्समध्ये ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’, ‘स्टोलन’ आणि ‘सेक्टर 36’ यांनी बाजी मारली.

जयदीप अहलावतचा अभिनय गाजला

‘पाताळ लोक सीझन 2’मधील दमदार भूमिकेसाठी जयदीप अहलावत याने सर्वोत्तम अभिनेता (नाटक) पुरस्कार पटकावून पुन्हा एकदा आपली अभिनयाची ताकद सिद्ध केली. याच मालिकेने समीक्षकांच्या पसंतीचा सर्वोत्तम मालिका पुरस्कारही मिळवला.

अभिनेत्रींच्या यादीत अनपेक्षित नाव

विनोदी सिरिजमध्ये ‘कॉल मी बे’साठी अनन्या पांडे हिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्याने अनेक चाहते चकित झाले. सोशल मीडियावर या निकालावर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसल्या, कारण हा विजय अपेक्षेबाहेरचा मानला जात आहे.

हेही वाचा – Filmmaker Michael Bay Collaborate With BSL : ट्रान्सफॉर्मर्सच्या दिग्दर्शकाची बीएसएल स्टुडिओसोबत भारतातील पहिली कलाकृती; ए. आर. रेहमान यांचं असणार संगीत

अभिनय आणि दिग्दर्शनात विविध नावांची चमक

नाटक प्रकारात मोनिका पनवार (‘खौफ’) आणि समीक्षकांच्या निवडीत रसिका दुग्गल (‘शेखर होम’) यांनी सर्वोत्तम अभिनेत्रीचे पुरस्कार मिळवले. दिग्दर्शनात ‘ब्लॅक वॉरंट’ आणि ‘द हंट: द राजीव गांधी हत्याकांड केस’ या मालिकांना मान मिळाला.

वेब ओरिजिनल फिल्म्समध्ये ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’ आघाडीवर

वेब फिल्म श्रेणीत ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’ सर्वोत्तम चित्रपट, तर दिग्दर्शक शुची तलाटी यांनाही सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. अभिनयात अभिषेक बॅनर्जी, सान्या मल्होत्रा, विक्रांत मॅसी आणि प्रीती पाणिग्रही यांची कामगिरी गौरवण्यात आली.

तांत्रिक बाजूने ‘खौफ’ आणि ‘Ctrl’चा दबदबा

छायांकन, संपादन, पार्श्वसंगीत, VFX आणि साउंड डिझाइन अशा अनेक तांत्रिक पुरस्कारांवर ‘खौफ’ने वर्चस्व गाजवले, तर वेब फिल्म्समध्ये ‘Ctrl’ने पटकथा, संपादन आणि संगीतासाठी पुरस्कार पटकावले.

हेही वाचा – Rishab Shetty On Ranveer Singh : रणवीर सिंगने कांताराची नक्कल केल्याबद्दल ऋषभ शेट्टीने सोडले मौन, म्हणाला, 'मी त्याच्याशी…'

नवोदित आणि ब्रेकथ्रू कलाकारांना संधी

ब्रेकथ्रू परफॉर्मन्समध्ये अनुराग ठाकूर आणि लिसा मिश्रा यांना गौरवण्यात आले, तर लघुपट श्रेणीत फातिमा सना शेख आणि अयान खान यांनी अभिनयाचे पुरस्कार पटकावले. एकूणच, फिल्मफेअर OTT अवॉर्ड्स 2025 ने डिजिटल मनोरंजनविश्वातील बदलती दिशा, नव्या चेहऱ्यांची चमक आणि अनुभवी कलाकारांची पकड यांचा सुंदर संगम प्रेक्षकांसमोर मांडला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number