2025 या वर्षात अनेक घडामोडी घडल्या. मनोरंजन विश्वासाठीही हे वर्ष अनपेक्षित घडामोडींचे ठरले. सिनेसृष्टीतील कलाकारांकडून चाहत्यांना वर्षभर हृदयस्पर्शी फोटो आणि भावनिक क्षणांची मेजवानी देण्यात आली. 2025 मध्ये चित्रपटसृष्टीत नव्या आवाजांची आणि ताज्या कल्पनांची प्रभावी लाट पाहायला मिळाली. विविध शैली, सामाजिक विषय, आणि प्रयोगशील कथनशैली यांमुळे 2025 हे वर्ष पदार्पण दिग्दर्शकांसाठी विशेष ठरले. नव्या पिढीच्या या दिग्दर्शकांनी केवळ मनोरंजनच नाही तर विचार करायला लावणाऱ्या कथा पडद्यावर आणत सिनेसृष्टीला नवी दिशा दिली. जाणून घेऊयात 2025 मध्ये पदार्पण केलेले दिग्दर्शक कोण?
यावेळी सर्वात आधी नाव येत ते बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते सोनू सूद यांनी त्यांचा पहिला वहिला दिग्दर्शित चित्रपट 'फतेह' मधून चित्रपट निर्माता म्हणून दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. 'फतेह' चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिससह सोनू सूद स्वत: मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात एका माजी एजंटची कथा दाखवण्यात आली आहे जो त्याच्या शांत जीवनातून बाहेर पडून संपूर्ण सायबर माफिया सिंडिकेटला पाडतो.
तसेच 7 फेब्रुवारी 2025 ला प्रदर्शित झालेल्या 'द मेहता बॉईज' हा चित्रपट बोमन इराणी यांनी दिग्दर्शित केलेला पहिलाच चित्रपट आहे. या बोमन इराणी, अविनाश तिवारी, श्रेया चौधरी, पूजा सरूप हे कलाकार पाहायला मिळाले असून यात वडील-मुलाच्या नात्यातील अनेकदा न पाहिलेले घटक दाखवण्यात आले. हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होण्यापूर्वी सर्वप्रथम ओटीटीवर आला.
तसेच बहुचर्चीत असलेल्या 'केसरी' या चित्रपटाचा 'केसरी अध्याय 2' या चित्रपटाचे दिग्दर्शक व्यवसायाने माजी वकील असलेले करण सिंग त्यागी हे आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'केसरी अध्याय 2' या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि अनन्या पांडे हे मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले आहेत. या चित्रपटात जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी वकील सर सी. शंकरन नायर यांच्या दृष्टिकोनातून दाखवण्यात आली असून हा चित्रपट 18 एप्रिल 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने त्याच्या 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' मालिकेद्वारे दिग्दर्शक म्हणून प्रवेश केला. 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' ही वेबसिरिझ नेटफ्लिक्सवर 18 सप्टेंबर 2025 रोजी प्रदर्शित झाली असून ती एक लोकप्रिय वेब सिरीज आहे. यामध्ये मुख्य कलाकार म्हणून बॉबी देओल, सहेर बंबा, लक्ष्य लालवानी, अर्शद वारसी हे पाहायला मिळतात. ही सिरीज बॉलिवूडच्या चकचकीत दुनियेमागे दडलेल्या अनेक गोष्टींवर प्रकाश टाकते. आर्यन खान हा त्याच्या पहिल्या वहिल्या वेब सिरिझमुळे आतापर्यंतच्या सर्वात चर्चेत असलेल्या दिग्दर्शनातील पदार्पणापैकी एक बनला.
हेही वाचा- Year Ender 2025 : 2025 मध्ये लग्नबंधनात अडकलेली लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपी
2025 मध्ये सर्वात जास्त गाजलेला आणि बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला तो अश्विन कुमार दिग्दर्शित 'महावतार नरसिंह' चित्रपट. या चित्रपटाने भारतीय अॅनिमेशनला एक नवीन दिशा दिली. हा चित्रपट 25 नोव्हेबर 2025 रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने तांत्रिक कौशल्यासाठी मोठ्या प्रमाणात कौतुक मिळवले आहे. याचा पुढचा पार्ट 'महावतार परशुराम' आहे.
त्यानंतर मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चिन्मय मांडलेकरने 'इन्स्पेक्टर झेंडे' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून एक निष्ठावान आणि धाडसी अधिकारी, मधुकर झेंडे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. हा चित्रपट 5 सप्टेंबर 2025 रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटात कुख्यात फ्रेंच सिरीयल किलर चार्ल्स शोभराजला दोनदा पकडणाऱ्या पोलिसांची सत्यकथा दाखवण्यात आली आहे. तसेच या चित्रपटात मनोज बापेयी, सरभ नेल, सचिन खेडेकर, गिरिजा ओक, भालचंद्र (भाऊ) कदम, वैभव मांगले, ओंकार राउत यांच्यासह इतर कलाकारांचा समावेश आहे.
वडीलांच्या पाठोपाठ मुलगी कायोज इराणीने देखील तिचा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. 25 जुलै 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या 'सरजमीन' या चित्रपटात इब्राहिम अली खान, काजोल आणि पृथ्वीराज सुकुमारन यांची प्रमुख भूमिका पाहायला मिळत आहे.
अभिनेता-दिग्दर्शक अंशुमन झा यांचा लेन्सच्या मागून पहिला चित्रपट 'लॉर्ड कर्झन की हवेली' या वर्षी 10 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शित झाला.अर्जुन माथूर, रसिका दुगल, परेश पाहुजा आणि झोहा रहमान यांचा या चित्रपटात सहभाग पाहायला मिळतो आहे.
12 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या 'साली मोहब्बत' या चित्रपटाद्वारे अभिनेत्री टिस्का चोप्राने दिग्दर्शनात पाऊल ठेवले. यात राधिका आपटे मुख्य भूमिकेत असून यात एका शांत छोट्या शहरातील गृहिणीची कथा दाखवण्यात आली आहे.