Thursday, December 05, 2024 06:59:59 AM

fulwanti will release on big screen
रुपेरी पडद्यावर अवतरणार ‘फुलवंती’

'फुलवंती' ही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली अलौकिक कलाकृती आहे. हीच अजरामर कलाकृती आता चित्रपट रूपात मराठी रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. 

रुपेरी पडद्यावर अवतरणार ‘फुलवंती’
fulwanti movie

जय महाराष्ट्र न्यूज : 'फुलवंती' ही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली अलौकिक कलाकृती आहे. हीच अजरामर कलाकृती आता चित्रपट रूपात मराठी रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. 

मनोरंजन विश्वात स्वतःचं वेगळं स्थान असणारे पॅनोरमा स्टुडिओज आणि वेगवेगळ्या कलाकृतींमधून आपला ठसा उमटविणारी चतुरस्त्र अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या संयुक्त विद्यमाने 'फुलवंती' ही भव्य कलाकृती रसिकांच्या भेटीला येत आहेत. 'फुलवंती' पॅनोरमा स्टुडिओजची आतापर्यंतची सर्वात मोठी मराठी चित्रपट निर्मिती ठरणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री प्राजक्ता माळी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करीत आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांनी केलं असून चित्रपटाचे दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. पखवाज आणि घुंगरांच्या जुगलबंदीचं ‘फुलवंती’ चित्रपटाचं लक्षवेधी पोस्टर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालं आहे.   

कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी आणि प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रसिद्ध छायाचित्रणकार महेश लिमये यांनी छायाचित्रणाची तर संगीताची जबाबदारी अविनाश-विश्वजीत यांनी सांभाळली आहे. मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोहम क्रिएशन्स प्रा.लि.निर्मित ‘फुलवंती’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

आपल्या निर्मितीच्या प्रवासाबद्दल प्राजक्ता म्हणते की, ‘फुलवंती' सारखी दर्जेदार साहित्यकृती माझ्याकडे आल्याने मी निर्माती म्हणून एक भव्य कलाकृती करण्यास तयार झाले. यासाठी पॅनोरमा स्टुडिओजने मला भक्क्कम पाठिंबा दिला, त्यातून माझा आत्मविश्वास उंचावला. 'फुलवंती' चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांना उत्तम कलाकृती देऊ शकेन,असा विश्वास मला आहे.' पॅनोरमा स्टुडिओजचे मॅनेजिंग डिरेक्टर कुमार मंगत पाठक चित्रपटाबद्दल सांगतात की, 'दर्जेदार संहिता आणि उत्तम कलावंत यामुळे चित्रपटासोबत आम्ही भक्कमपणे उभे आहोत.' 

अमोल जोशी प्रोडक्शन्स, मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत तर विक्रम धाकतोडे सहाय्यक निर्माते आहेत. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे. 'फुलवंती'च्या माध्यमातून पखवाज आणि घुंगरांची रंगणारी जुगलबंदी रसिकांसाठी मनोरंजनाची अपूर्व पर्वणी ठरणार आहे.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo