Asha Bhosle Death : आजचा दिवस भारतीय संगीतप्रेमींसाठी अत्यंत दुःखद ठरला. महान गायिका आशा भोसले यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त समजताच केवळ संगीत क्षेत्रच नव्हे, तर क्रिकेट विश्वही शोकाकुल झाले आहे. आशाताईंच्या निधनावर क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे. सचिनने लिहिले की, “आशाताई आमच्या कुटुंबाचाच एक अविभाज्य भाग होत्या. आज आम्हाला होत असलेल्या अतीव दुःखाचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत. एका क्षणासाठी हृदय पूर्णपणे शांत झाले आहे, तरीही त्यांच्या अजरामर गीतांच्या माध्यमातून त्या सदैव आपल्यात जिवंत राहतील.”
A deeply sad day for India, and for music lovers across the world. For us, Asha Tai was family. Today, words feel too small for the loss we feel. One moment the heart falls silent, and the next, it drifts through the countless melodies she gifted all of us. It feels as… — Sachin Tendulkar (@sachin_rt) April 12, 2026
विराट कोहली आणि शिखर धवनकडून आदरांजली
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनेही आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण केली. इन्स्टाग्रामवर त्यांचा फोटो शेअर करत विराटने लिहिले, “ईश्वर आशा भोसले जी यांच्या आत्म्यास शांती देवो. तुमचा आवाज लक्षावधी लोकांच्या हृदयाला भिडला आहे आणि तो आमच्या हृदयात सदैव गुंजत राहील.” भारताचा माजी सलामीवीर शिखर धवन यानेही ‘X’ वर पोस्ट करत म्हटले की, आशाजींचा आवाज सदाबहार होता जो कधीच जुना होणार नाही. भारतीय क्रिकेटमधील या दिग्गजांच्या संदेशांतून आशा ताईंच्या आवाजाचा प्रभाव क्रीडा विश्वावरही किती खोल होता, हे स्पष्ट झाले.
Grew up listening to her voice… and it never got old. Asha Bhosle ji will always remain timeless. Om Shanti ? pic.twitter.com/aLV8MQfNBi — Shikhar Dhawan (@SDhawan25) April 12, 2026
‘तो केवळ आवाज नव्हता, तर एक भावना होती’; अजिंक्य रहाणे भावूक
अजिंक्य रहाणे आणि अनिल कुंबळे यांसारख्या खेळाडूंनीही आशा भोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. अजिंक्य रहाणेने आपल्या संवेदना व्यक्त करताना म्हटले की, “आशा भोसले जी यांचा आवाज केवळ संगीत नव्हते, तर ती एक भावना होती जी काळाच्या पलीकडची आणि अविस्मरणीय आहे.” आशा ताईंना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर 11 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने क्रिकेटपटूंनी आपल्या कुटुंबातील एक सदस्य गमावल्याची भावना व्यक्त केली आहे.
Deeply saddened to hear about the passing of Asha Bhosle ji. Her voice wasn’t just music, it was emotion, timeless and unforgettable. Heartfelt condolences to her family and loved ones. — Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) April 12, 2026
मैदानाबाहेरचे अतुट नाते
आशा भोसले आणि सचिन तेंडुलकर यांचे नाते अत्यंत घट्ट होते. सचिन त्यांना आपली मोठी बहीण मानत असे आणि अनेकदा त्यांच्या भेटीचे फोटो समोर येत असत. आशा ताईंच्या निधनामुळे सचिनने आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा मार्गदर्शक आणि कौटुंबिक आधार गमावला आहे. सचिन व्यतिरिक्त संपूर्ण क्रिकेट विश्वाने भारतीय संगीतातील या ‘आशा’ दीपकाला विनम्र अभिवादन केले असून, त्यांच्या गायकीचा वारसा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत व्यक्त केले आहे.