मुंबई: अभिनेता सोनू सूदचे नाव नेहमी लोकांच्या मदतीसाठी पुढे येते. कोरोनाकाळात त्यांनी हजारो गरजू लोकांना मदत करून जनतेच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, गरजूंच्या मदतीला धावणारा सोनू सूद आता स्वत: मोठ्या आडचणीत सापडला आहे. कारण, त्यांच्या आलिशान हॉटेलवर बुलडोझर चालण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईतील वर्सोवाजवळ असलेल्या सात बंगल्याच्या आराम नगर परिसरात असलेले 'हॉटेल लव्ह ॲंड लाते' हे सोनू सूदचे हॉटेल आहे. याच ठिकाणी सोनूचे आफिसदेखील आहे. काही दिवसांपूर्वी याच हॉटेलमध्ये सोनू सूदने त्याचा वाढदिवस साजरा केला होता. मात्र, या हॉटेलमध्ये बेकायदेशीर काम होत असल्याचा आरोप होत असून म्हाडाने नोटीस बजावली आहे.
म्हाडाने आपल्या नोटीसमध्ये स्पष्ट केले की, यापूर्वी अनेकदा नोटीस बजावले, तरीही 'हॉटेल लव्ह ॲंड लाते'च्या प्रशासनाने आवश्यक कागदपत्रे सादर केले नाहीत. अगदी 18 सप्टेंबर 2025 रोजी सुनावणीची संधी देऊनही अभिनेता न्यायालयात उपस्थित राहिला नाही. त्यामुळे, हे बांधकाम बेकायदेशीर आहे'.
हेही वाचा: Gaurav More: ताडपत्री ते फ्लॅट…, गौरव मोरेला मिळालं हक्काचं घर
यासह, म्हाडाने दिलेल्या नोटिसनुसार, हॉटेलमध्ये केलेले विनापरवाना बांधकाम तातडीने हटवावे, अन्यथा ते सरकारी यंत्रणेमार्फत काढण्यात येईल आणि त्याचा खर्च हॉटेलकडून वसूल केला जाईल. ही कारवाई, महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 52 आणि 53 अंतर्गत केली जाणर आहे.
सोनू सूद हा बॉलिवूडमध्ये विशेषत:खलनायकाच्या भूमिकांसाठी ओळखला जातो. मात्र, पडद्याबाहेर त्याची खरी ओळख म्हणजे समाजसेवक अशीच झाली आहे. मात्र, आता सोनू सूद स्वत:च्यात हॉटेलवरील बेकायदेशीर बांधकामामुळे अडचणीत आले असून, या प्रकरणी पुढे काय होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.