Asha Bhosale Death : आशाताईंना या गाण्यासाठी मिळाला फिल्मफेअर पुरस्कार, मात्र हे गाणं चित्रपटात कधी घेतलच नाही; काय आहे किस्सा? जाणून घ्या

सुरेल आवाजाची दैवी देणगी असलेल्या आशाताई भोसले यांच्या नावे हजारो गाणी गाण्याचा रेकॉर्ड आहे. त्यांच्या गाण्यांना आजवर अनेक पुरस्कारांनीही सन्मानिक करण्यात आले आहे. मात्र त्यांच एक असही गाणं आहे, ज्याला पुरस्कार तर मिळाला, पण ते कधी चित्रपटात चित्रितच झाले नाही. 1974 साली प्रदर्शित झालेल्या ‘प्राण जाये पर वचन ना जाये’ या चित्रपटातील ‘चैन से हम को कभी आप ने […]

Asha Bhosale Death : आशाताईंना या गाण्यासाठी मिळाला फिल्मफेअर पुरस्कार, मात्र हे गाणं चित्रपटात कधी घेतलच नाही; काय आहे किस्सा? जाणून घ्या

सुरेल आवाजाची दैवी देणगी असलेल्या आशाताई भोसले यांच्या नावे हजारो गाणी गाण्याचा रेकॉर्ड आहे. त्यांच्या गाण्यांना आजवर अनेक पुरस्कारांनीही सन्मानिक करण्यात आले आहे. मात्र त्यांच एक असही गाणं आहे, ज्याला पुरस्कार तर मिळाला, पण ते कधी चित्रपटात चित्रितच झाले नाही. 1974 साली प्रदर्शित झालेल्या ‘प्राण जाये पर वचन ना जाये’ या चित्रपटातील ‘चैन से हम को कभी आप ने जीने ना दिया’ या गाण्याच्या पार्श्वगायनासाठी आशा भोसले यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार देण्यात आला होता. परंतू, हे गाणं चित्रपटात वापरले गेले नाही. आशाताईंच्या आवाजाची जादू इतकी प्रभावी होती की, कधीही पडद्यावर न आलेल्या गाण्यादेखील पुरस्कार मिळवून गेली. 

हेही वाचा : Asha Bhosle: मंगेशकर कुटुंबाची लेक 'भोसले' कशी झाली? आशा ताईंच्या नावामागचा 'तो' धाडसी निर्णय

आशा भोसले यांनी त्यांच्या कारकिर्दीत 18 नामांकनांपैकी 9 वेळा फिल्मफेर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार जिंकले आहेत. त्यांनी त्यांचे पहिले दोन पुरस्कार 1967 आणि 1968 मध्ये जिंकले होते. तसेच 1979 मध्ये पुरस्कार मिळाल्यानंतर, आशा भोसले यांनीही आपल्या बहिणीचे अनुकरण केले आणि यापुढे नामांकनांसाठी त्यांच्या नावाचा विचार केला जाऊ नये, अशी विनंती केली. असे असूनही, त्या आजपर्यंत या पुरस्काराच्या सर्वाधिक वेळा विजेत्या ठरल्या आहेत. पुढे 'रंगीला' चित्रपटासाठी विशेष पुरस्कार आणि 2001 मध्ये जीवनगौरव पुरस्कार हे त्यांचे फिल्मफेअरचे अखेरचे पुरस्कार ठरले आहेत.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 11 एप्रिल रोजी त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र 12 एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव रुग्णालयातून घरी नेण्यात आले असून रविवार अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. तर आज, सोमवारीदेखील सकाळी 10 ते 12 दरम्यान, त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. तसेच सायंकाळी 4 वाजता शिवाजी पार्कांत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number