Jacqueline Fernandez: मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचा यू-टर्न; सरकारी साक्षीदार बनण्यास दिला नकार, कोर्टातून अर्ज घेतला मागे

सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित असलेल्या या प्रकरणात 'सरकारी साक्षीदार' बनण्यासाठी दिलेला अर्ज जॅकलिनने मंगळवारी मागे घेतला.

Jacqueline Fernandez: मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचा यू-टर्न; सरकारी साक्षीदार बनण्यास दिला नकार, कोर्टातून अर्ज घेतला मागे

Jacqueline Fernandez: 200 कोटी रुपयांच्या बहुचर्चित मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने एक मोठे पाऊल उचलले आहे. सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित असलेल्या या प्रकरणात 'सरकारी साक्षीदार' बनण्यासाठी दिलेला अर्ज जॅकलिनने मंगळवारी मागे घेतला. जॅकलिनच्या वकिलांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, विशेष न्यायाधीश प्रशांत शर्मा यांच्यासमोर हा अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) जॅकलिनच्या या अर्जाला कडाडून विरोध केल्यानंतर तिने हा निर्णय घेतल्याचे समजते.

ED चा जॅकलिनच्या अर्जाला तीव्र विरोध 
सोमवारी न्यायालयात सादर केलेल्या उत्तरात ED ने जॅकलिनवर गंभीर ताशेरे ओढले होते. तपास यंत्रणेने म्हटले की, "सुकेश चंद्रशेखरचा गुन्हेगारी इतिहास माहीत असूनही जॅकलिन त्याच्याशी सतत संपर्कात राहिली होती. सुकेशने मनी लाँड्रिंगच्या पैशातून जॅकलिनसाठी महागड्या भेटवस्तू, वस्तू आणि विविध लाभांची पद्धतशीर व्यवस्था केली होती." जॅकलिन या प्रकरणात केवळ एक 'अजाणता बळी' (Unwitting Victim) असल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा असून, तिचे मुख्य आरोपीसोबतचे संबंध जाणीवपूर्वक आणि स्वेच्छेने होते, असेही ED ने स्पष्ट केले.

काय आहे सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरण?
ठग सुकेश चंद्रशेखर याच्यावर पंतप्रधान कार्यालय (PMO) आणि गृह मंत्रालयाचा उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे भासवून व्यावसायिक महिला अदिती सिंग यांची 200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या चौकशीत जॅकलिन फर्नांडिसचे नाव समोर आले. सुकेश तिचा प्रियकर असताना त्याने तिला कोट्यवधींच्या भेटवस्तू दिल्याचा आरोप आहे. सुरुवातीला डिसेंबर 2021 मध्ये दाखल झालेल्या तक्रारीत जॅकलिनचे नाव नव्हते, मात्र 17 ऑगस्ट 2022 रोजी ED ने दाखल केलेल्या पुरवणी तक्रारीत तिला आरोपी करण्यात आले.

अभिनेत्रीच्या अडचणी वाढवणारे खुलासे
तपास यंत्रणेने न्यायालयाला सांगितले की, विविध माध्यमांतून झालेला संवाद आणि सुकेशकडून मिळालेले आर्थिक लाभ हे जॅकलिनचा गुन्ह्यातील सहभाग दर्शवतात. मुख्य आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची कल्पना असूनही तिने हे संबंध कायम ठेवले, ही बाब जॅकलिनसाठी कायदेशीररीत्या अडचणीची ठरू शकते. सरकारी साक्षीदार होण्याचा अर्ज मागे घेतल्यामुळे आता जॅकलिनला या प्रकरणात आरोपी म्हणून कायदेशीर लढाई सुरू ठेवावी लागणार आहे.

हेही वाचा – Abhishek Bachchan on Raja Shivaji: 'राजा शिवाजी' चित्रपटात मानधन न घेण्यावरून अभिषेक बच्चनने सोडलं मौन, म्हणाला, 'हा केवळ पैशांचा व्यवहार…'

न्यायालयीन प्रक्रियेत नवीन वळण
जॅकलिनने अर्ज मागे घेतल्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीला आता नवीन वळण मिळाले आहे. सुकेश चंद्रशेखर सध्या तुरुंगात असून त्याच्यासोबतच आता जॅकलिनवरही न्यायालयीन प्रक्रियेचा फास आवळला जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे संपूर्ण बॉलिवूड आणि देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number