Friday, July 11, 2025 10:57:39 PM

करिश्मा कपूरचा माजी पती संजय कपूरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 53 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

संजय कपूर यांनी वयाच्या 53 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. संजय कपूर यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

करिश्मा कपूरचा माजी पती संजय कपूरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन 53 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Sunjay Kapur Dies
Edited Image, X

Sunjay Kapur Death: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा पती पती संजय कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. संजय कपूर यांनी वयाच्या 53 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. संजय कपूर यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. संजय कपूर यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत. आज तकच्या वृत्तानुसार, 12 जून रोजी संजय कपूर पोलो खेळत होते. यादरम्यान संजय यांना हृदयविकाराचा झटका आला. पोलो खेळताना त्यांचा मृत्यू झाला. 

हेही वाचा - विक्रांत मेस्सीच्या भावाचा अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू, अभिनेत्याने शेअर केली भावनिक पोस्ट

संजय कपूर आणि करिश्माचा घटस्फोट - 

संजय कपूर यांनी 2003 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरशी लग्न केले. तथापि, लग्नाच्या काही वर्षांनी अभिनेत्री आणि संजय यांचा घटस्फोट झाला. 1016 मध्ये, करिश्मा आणि संजय एकमेकांना घटस्फोट देऊन वेगळे झाले. संजय आणि करिश्माला दोन मुले देखील आहेत.

हेही वाचा - DINO MOREA: मिठी नदी गाळ प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाची ईडी चौकशी

संजय कपूर अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिले आहेत. संजय कपूर आणि करिश्मा कपूरची प्रेमकहाणी देखील खूप लोकप्रिय आहे. संजयचे चाहते आणि हितचिंतक त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करत आहेत. संजयच्या मृत्यूमुळे सर्वांना धक्का बसला आहे. 
 


सम्बन्धित सामग्री