Best Debut Director: बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने अभिनयाचा पडदा सोडून कॅमेऱ्याच्या मागची धुरा सांभाळत सिनेसृष्टीत आपला दबदबा निर्माण केला आहे. त्याच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या गाजलेल्या वेब सीरिजसाठी आर्यनला ‘बेस्ट डेब्यू डायरेक्टर ऑफ द इयर’ (सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक) या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
NBT उत्सव 2026 मध्ये आर्यनचा गौरव
‘नवभारत टाइम्स’च्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित ‘NBT Utsav 2026’ या दिमाखदार सोहळ्यात मनोरंजन विश्वातील दिग्गजांची मांदियाळी जमली होती. याच सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आर्यन खानला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या सीरिजने केवळ प्रेक्षकांचीच नव्हे, तर समीक्षकांचीही मने जिंकली आहेत. दरम्यान, ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ ही वेब सीरिज नेटफ्लिक्सच्या ‘ग्लोबल टॉप 10’ मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली होती. भारतीय चित्रपटसृष्टीतील घडामोडींवर उपरोधिक भाष्य करणाऱ्या या सीरिजमुळे आर्यनच्या दिग्दर्शकीय कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्टार किड असूनही अभिनयाऐवजी दिग्दर्शनासारख्या आव्हानात्मक क्षेत्राची निवड करून आर्यनने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
पुरस्कार प्रदान करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्यनच्या जिद्दीचे कौतुक केले. “एका मोठ्या घराण्याचा वारसा असतानाही, स्वतःचा वेगळा मार्ग निवडणे आणि त्यात इतके मोठे यश संपादन करणे ही कौतुकास्पद बाब आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्याला शाबासकी दिली.
? CM Devendra Fadnavis at ‘Utsav NBT-75: Pragati Ke Path Par Maha-Mumbai’ event, organised to mark the 75th anniversary of Navbharat Times Mumbai.
Minister Mangal Prabhat Lodha, MP Milind Deora and other dignitaries were present. ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नवभारत… pic.twitter.com/lB9UCzkVMk — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 20, 2026
खान कुटुंबात आनंदाचे वातावरण
या सोहळ्याला पंकज त्रिपाठी, मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांसारख्या कलाकारांनी हजेरी लावली होती. मुलाच्या या यशावर शाहरुख खाननेही समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, आर्यन आता त्याच्या आगामी मोठ्या चित्रपटाच्या तयारीला लागला असून, लवकरच तो मोठ्या पडद्यावर दिग्दर्शक म्हणून पदार्पण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.