Kon Honar Crorepati : माधुरीच्या चाहत्यांसाठी खूशखबर! छोट्या पडद्यावरील पदार्पणाची तारीख ठरली; ‘कोण होणार करोडपती’चा ‘या’ मुहूर्तावर होणार शुभारंभ

<br/>80, 90 आणि 2000 च्या दशकाला आपल्या अदांनी घायाळ करणारी मराठमोळी अभिनेत्री आणि बॉलीवूडची धक-धक गर्ल आता छोट्या पडद्यावरील सर्वात मोठ्या शोमध्ये दिसणार आहे. 'कोण होणार करोडपती'च्या सातव्या सीझनमध्ये

Kon Honar Crorepati : माधुरीच्या चाहत्यांसाठी खूशखबर! छोट्या पडद्यावरील पदार्पणाची तारीख ठरली; ‘कोण होणार करोडपती’चा ‘या’ मुहूर्तावर होणार शुभारंभ

80, 90 आणि 2000 च्या दशकाला आपल्या अदांनी घायाळ करणारी मराठमोळी अभिनेत्री आणि बॉलीवूडची धक-धक गर्ल आता छोट्या पडद्यावरील सर्वात मोठ्या शोमध्ये दिसणार आहे. ‘कोण होणार करोडपती’च्या सातव्या सीझनमध्ये माधुरी दीक्षित सूत्रसंचालनाच्या भूमिकेत झळकणार असून, हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकांना ती प्रश्न विचारताना दिसणार आहे.

 

 

सामान्य ज्ञान, भारतीय इतिहास, भूगोल आणि विज्ञान अशा विविध विषयांवरील प्रश्नांच्या या ज्ञानआधारित शोला माधुरीच्या येण्याने एक वेगळीच रंगत येणार आहे.’कोण होणार करोडपती’च्या इतिहासात पहिल्यांदाच एखादी दिग्गज महिला अभिनेत्री अशा भव्य शोचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. याआधी सचिन खेडेकर, स्वप्नील जोशी, महेश मांजरेकर आणि नागराज मंजुळे यांसारख्या दिग्गजांनी या मंचाची धुरा सांभाळली आहे. 

हेही वाचा – Salman Khan : बिग बॉसच्या विकेंड का वारमध्ये सलमान खानने काढला टी-शर्ट; वयावरून – शरीरावरून ट्रोल करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

आता माधुरी दीक्षितच्या एन्ट्रीमुळे या शोला एक नवी उंची मिळणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये माधुरीचा पारंपरिक आणि रुबाबदार लूक पाहायला मिळत आहे. ‘आम्ही तयार आहोत… तुम्ही तयार आहात ना? कारण आता खेळ बदलणार!’ असे म्हणत तिने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. हा शो 12 ऑक्टोबरपासून सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number