Dhurandhar Movie Update : ‘धुरंधर’समोर मोठा पेच! प्रदर्शनाच्या तोंडावर दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल, शहीद मेजरच्या कुटुंबीयांची काय आहे मागणी?

अभिनेता रणवीर सिंह याची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट 'धुरंधर' कायदेशीर अडचणीत सापडला आहे. शहीद मेजर मोहित शर्मा यांच्या कुटुंबीयांनी हा चित्रपट मोहित यांच्या हौतात्म्यावर आधारित असल्याचे म्हटले आहे.

Dhurandhar Movie Update : ‘धुरंधर’समोर मोठा पेच! प्रदर्शनाच्या तोंडावर दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल, शहीद मेजरच्या कुटुंबीयांची काय आहे मागणी?

Stay Demand on Dhurandhar Movie Release : अभिनेता रणवीर सिंह याची प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘धुरंधर’ (Dhurandhar) 5 डिसेंबरला जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. मात्र, सर्व तयारी झालेली असतानाच, तो कायदेशीर अडचणीत सापडला आहे. शहीद मेजर मोहित शर्मा यांच्या कुटुंबीयांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती (Stay on Movie Release) आणण्याची मागणी करत दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) याचिका दाखल केली आहे. ‘धुरंधर’ची कथा आपल्या मुलाच्या शौर्य आणि बलिदानावर आधारित असूनही, चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या कुटुंबाची कोणतीही परवानगी (Permission) घेतली नाही, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

शहिदाच्या परिवाराचे खासगी आणि संवैधानिक अधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप
मेजर मोहित शर्मा हे 2009 मध्ये, वयाच्या 31 व्या वर्षी, जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे एका ‘अंडरकव्हर ऑपरेशन’दरम्यान (Undercover Operation) दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, चित्रपटाचा ट्रेलर, प्रमुख पात्रे, लष्करी पार्श्वभूमी आणि संपूर्ण कथानक त्यांच्या मुलाच्या जीवनाशी साधर्म्य दर्शवते. त्यामुळे, त्यांची परवानगी न घेता बनवलेला हा चित्रपट त्यांच्या गोपनीयता (Privacy), प्रतिष्ठा आणि संवैधानिक अधिकारांचे उल्लंघन करतो. मात्र, काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक आणि निर्माता आदित्य धर यांनी हा चित्रपट मेजर मोहित शर्मा यांच्यावर आधारित नसल्याचे अधिकृतपणे सांगितले होते.

हेही वाचा – Rohit Raut: मराठमोळ्या गायकाची कमाल! रोहित राऊत झाला I-Popstar शोचा विजेता; बक्षीसाची रक्कम वाचून थक्क व्हाल

राष्ट्रीय सुरक्षेवर प्रश्नचिन्ह आणि चित्रपटातील संवेदनशील बाबी
दाखल केलेल्या याचिकेत असा आरोप करण्यात आला आहे की, चित्रपटात देशाच्या सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित संवेदनशील बाबी दाखवण्यात आल्या आहेत. यामध्ये स्पेशल ट्रूप्सची स्ट्रॅटेजी, अंडरकव्हर मिशनचे पॅटर्न आणि काउंटर-टेरर (Counter-Terror) तंत्रांचा समावेश आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा (National Security) प्रश्न निर्माण होऊ शकतो. या याचिकेत माहिती आणि प्रसारण मंत्रालय, सेना एडीजीपीआय, सेन्सॉर बोर्ड, दिग्दर्शक आदित्य धर आणि प्रॉडक्शन हाऊस जिओ स्टुडिओज (Jio Studios) यांना पक्षकार करण्यात आले आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनावर तातडीने स्थगितीची मागणी
शहीद मेजरच्या कुटुंबीयांनी कोर्टाकडे ‘धुरंधर’च्या प्रदर्शनावर तत्काळ स्थगिती (Immediate Stay) देण्याची मागणी केली आहे. तसेच, प्रदर्शनापूर्वी चित्रपटाचे खासगी स्क्रीनिंग (Private Screening) करण्याचीही त्यांनी कोर्टाकडे विनंती केली आहे. या चित्रपटात रणवीर सिंह सोबतच संजय दत्त, आर. माधवन, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल यांसारखे मोठे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर, 20 वर्षीय सारा अर्जुन ही चित्रपटाची प्रमुख अभिनेत्री आहे.

हेही वाचा – Lin Laishram Pregnancy News: रणदीप हुडाचे चाहत्यांना सरप्राईज! लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त शेअर केली गुड न्यूज

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number